माल चोरीला गेला पावणेचार लाखाचा, पोलीस म्हणतात, सव्वा लाखाचीच नोंद घेऊ... वाळूज MIDC पोलिसांचे हे चाललंय काय?  (व्हिडीओसह)

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : माल पावणेचार लाख रुपयांचा चोरीला गेला असता एक ते सव्वा लाखापर्यंतच नोंद घेऊ, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने गाडीचालक हैराण झाला. हे प्रकरण चव्हाट्याच्या येण्याच्या शक्यतेने नंतर चालकाच्या म्हणण्यानुसार, सव्वा चार लाख रुपयांच्या मालाची चोरी दाखविण्यात आली. वाळूज एमआयडीसी पोलिसांचे असे फिर्यादींना छळण्यामागचे कारण काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नक्की काय घडलं?
संजय प्रल्हाद नांदवे (वय ४८, रा. सारा कीर्ती अपार्टमेंट, वडगाव कोल्हाटी, वाळूज एमआयडीसी परिसर) यांनी तक्रार दिली, की ते सध्या गोकुळधाम सोसायटी अयोध्यानगर, बजाजनगर येथे किरायाने राहतात. त्यांच्याकडे मालवाहू चारचाकी (क्र. एमएच २० इएल ९८९६) आहे. १८ ऑक्‍टोबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईहून ते वर्ध्यासाठी एका कंपनीचा माल घेऊन निघाले होते. मात्र १९ ऑक्‍टोबरला सकाळी छत्रपती संभाजीनगरला आले. पुढे जात असताना, ज्या कंपनीत माल पोहोचवायचा होता, त्या कंपनीला सुटी असल्याने त्यांनी घराकडे येत बजाजनगर येथील अयोध्यानगरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ गाडी सकाळी सव्वादहाच्या सुमारास उभी केली.

जेवण करण्यासाठी घरी गेले. दुपारी १२ ला परत गाडीजवळ आले. रात्री साडेनऊला वर्ध्याला जाण्यासाठी त्यांनी गाडी चालू केली असता चालू झाली नाही. त्यामुळे घरी कळवून ते गाडीतच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी २० ऑक्‍टोबरला पहाटे साडेतीनला उठून घरी जाऊन फ्रेश होऊन परत पहाटे पाचला गाडीजवळ आले असता गाडीला बांधलेली ताडपत्री व त्यावरील दोरी तुटलेली दिसली. गाडीमधील ४ लाख २३ हजार १०० रुपयांचे बार रोलिंग मील (८ नग, स्पेअर पार्ट) गायब होते. नांदवे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रकार
नांदवे यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते पोलीस ठाण्यात तक्रार करायला आले तेव्हा पोलिसांनी जेवढ्या रकमेचा माल चोरीला गेला तेवढी नोंद करण्यास सुरुवातीला नकार दिला. एक ते सव्वा लाखापर्यंतचीच नोंद घेऊ, असे पोलिसांचे म्हणणे होते. पोलिसांच्या या भूमिकेमागचे गौडबंगाल कळण्यास वाव नव्हता. मात्र या प्रकारामुळे पोलीस कशाप्रकारे फिर्यादींना त्रास देतात, हेच समोर आले आहे. याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर येण्याची शक्यता लक्षात येताच पोलिसांनी नांदवे यांच्या सांगण्यावरून माल चोरीला गेल्याची नोंद घेतली, हे विशेष.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software