गुन्हेगार युसूफला रिक्षा चालवायला दिली, भाऊही गोत्यात आला..., बाबा पेट्रोलंपप चौकातील घटनेनंतर वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बाबा पेट्रोलपंप चौकात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रिक्षाचालकाने घडवलेल्या थरारानंतर वेदांतनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल तर केलाच, पण तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे माहीत असूनही त्याला रिक्षा चालवायला दिल्याने रिक्षामालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रिक्षाचालक युसूफ मोहम्मद अली अन्सारी (वय २७) आणि रिक्षामालक असलेला त्याचा भाऊ मोहम्मद इब्राहिम अली अन्सारी (दोघे रा. मोमीनपुरा मशिदीजवळ, दौलताबाद) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावणी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गायकवाड यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. गायकवाड हे बाबा पेट्रोलपंप सिग्नलवर असताना पोलीस अंमलदार तुकाराम टाकसाळे, महिला पोलीस अंमलदार गंगा गवळी यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सचिन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियमन करत होते.

दुपारी १ च्या सुमारास सेशन कोर्टाकडून बाबापेट्रोलपंप सिग्नलवरून रेल्वस्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर युसूफ अन्सारीने त्याची रिक्षा (एमएच २० इके ४६३२) प्रवासी भरण्यासाठी उभी केली. त्याने गणवेश परिधान केला नसल्याने टाकसाळे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे संतापलेल्या युसूफने रिक्षा वेगात त्यांच्या अंगावर घातली आणि चिरडून मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक दिली आणि २० फूट फरपटत नेले. यात टाकसाळे यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो रिक्षा घेऊन सुसाट पळून गेला. ही रिक्षा मोहम्मद इब्राहिम मोहम्मद अली अन्सारी याची असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला संपर्क केला असता रिक्षा त्याचा भाऊ  युसूफ अली अन्सारी चालवत असल्याचे त्याने सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविणा यादव करत आहेत.

युसूफविरुद्ध यापूर्वीही वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याने रेल्वेस्थानकाजवळ ११ ऑगस्टला सायंकाळी सहाला कामगार कल्याण कार्यालयातील वर्ग २ च्या अधिकारी असलेल्या महिलेकडे जास्तीचे पैसे मागून शिवीगाळ, धमक्या देत विनयभंग केला होता. त्याला आवरण्यासाठी आलेल्या दोन वाहतूक पोलिसांना त्याने धक्काबुक्की करत त्यांच्या हातातील चालान मशीन फेकून दिले होते. त्यावेळी अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जामीन झाला होता. त्यामुळे त्याची हिंमत वाढून त्याने आता थेट पोलिसालाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह...
दरम्यान, या घटनेनंतर मोठ्या चौकांत पुरेसा बंदोबस्त देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. एकट्यादुकट्या पोलिसांना पाहून गुन्हेगार चालक अनेकदा त्यांच्या जिवावरही उठतात. बाबा पेट्रोलपंप चौकात एका अधिकाऱ्यासह ४ पोलीस तैनात असूनही युसूफची वाढलेली हिंमत धक्कादायक आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software