बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह आढळला पारधेश्वर मंदिराजवळील विहिरीत!; पळशी रोडवरील घटनेने खळबळ, ४ दिवसांपासून सुरू होता शोध

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : घराजवळच खेळणारी चिमुकली बेपत्ता झाल्याची घटना पळशी (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारातील ओमकार सिटी या बांधकाम साइटवर मंगळवारी (११ नोव्हेंबर) दुपारी अडीचला समोर आली होती. तेव्हापासून पोलीस तिचा कसोशीने शोध घेत होते. घटनेच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी (१४ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पारधेश्वर मंदिराजवळील शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या विहिरीत शोध घेण्यात आला होता.

राशी सिनू चौहान (वय ५ वर्षे ५ महिने, रा. खापरखेडा, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, ह. मु. ओमकार सिटी, पळशी रोड, छत्रपती संभाजीनगर) असे मृतदेह आढळलेल्या चिमुकलीचे नाव आहे. सिनू रामा चौहान (वय २३) यांनी त्यांची मुलगी राशी हरवल्याची तक्रार चिकलठाणा पोलीस ठाण्यात ११ नोव्‍हेंबरला दिली होती. ते ३ महिन्यांपासून पत्नी सुनिता, मुलगी आरोशी, मुलगा आयुश यांच्यासह ओमकार सिटी येथील बांधकाम साइटवर लेबर म्हणून कामाला आले होते. त्यांची मोठी मुलगी राशी मामाकडे मूळगावी राहत होती. मात्र घटनेच्या १५ दिवसांपूर्वीच ती आई-वडिलांकडे राहायला आली होती.

११ नोव्‍हेंबरला सकाळी ९ ला सिनू घराशेजारीच काम करण्यासाठी गेले होते. पत्नी आणि तिन्ही मुले घरीच होते. दुपारी २ ला सिनू जेवणासाठी घरी आले तेव्हा राशी मुलांसोबत खेळत होती. त्यानंतर सिनू कामावर गेले. दुपारी अडीचला त्यांनी पुन्हा मुलांकडे लक्ष दिले असता मुलगी राशी दिसली नाही. त्यामुळे सिनू यांनी लेबर आणि ठेकेदारासोबत मिळून राशीचा शोध घेतला. सायंकाळी ७ पर्यंत राशी कुठे दिसली नाही. अखेर चिकलठाणा पोलिसांना कळवले होते. उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे, सहायक पोलीस निरीक्षक समाधान पवार, पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी राशीचा शोध सुरू केला.

स्‍थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांची ४ पथके राशीचा शोध घेत होते. पोलिसांनी ठिकठिकाणी परिसरात पोस्टरही लावले होते. शुक्रवारी ती परिसरातील एका किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली होती. त्यानंतर ओमकार सिटीच्या २०० ते ३०० मीटर अंतरावरील पारधेश्वर मंदिराजवळील शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत पोलिसांनी पुन्हा तपासले असता राशीचा मृतदेह तरंगताना आढळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी राशीचा मृतदेह बाहेर काढला. श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळले. तीन-चार दिवसांपासून मृतदेह विहिरीत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. आज, १५ नोव्‍हेंबरला मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर अधिक गोष्टी निष्पन्न होतील, असे पोलिसांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software