- News
- सिटी क्राईम
- मोठी बातमी : ‘जोया’ने हनी ट्रॅपमध्ये अडकवले, ३ साथीदारांनी बेदम मारहाण करत व्यापाऱ्याला १ लाखाने लुट...
मोठी बातमी : ‘जोया’ने हनी ट्रॅपमध्ये अडकवले, ३ साथीदारांनी बेदम मारहाण करत व्यापाऱ्याला १ लाखाने लुटले, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी मागितले ५ लाख, सिडको एमआयडीसीतील धक्कादायक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सहकार्याने) : जोया नावाच्या मुलीने व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत नारेगावमध्ये भेटायला बोलावले. व्यापारी आल्यानंतर अचानक तिघांनी आमच्या बहिणीचे आयुष्य खराब केले असे म्हणत बेदम मारहाण सुरू केली. मारहाणीचा व्हिडीओही बनवला. व्हिडीओ व्हायरल करायचा नसेल तर ५ लाख रुपये दे, असे धमकावले आणि तत्काळ १ लाख रुपयेसुद्धा घेतले. व्यापाऱ्याने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज, ११ सप्टेंबरला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी जोया आणि ३ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तुझा व्हिडीओ व्हायरल करू द्यायचा नसेल तर पाच लाख रुपये दे, असे धमकावले. त्यामुळे जहीर हे घाबरून गेले. जहीर यांनी त्यांच्या चिकलठाण्यातील मित्राला कॉल केला व सांगितले, की मला एक लाख रुपये तात्काळ लागतात. तुमच्याकडे एक व्यक्ती व त्यासोबत फरान नावाचा मुलगा हे दोघे नारेगाव येथील हॉटेल सबेरा येथे येतील. त्यांच्याजवळ पैसे द्या... पैशाचे बोलणे होताच तिघांनी लगेचच लोकांनी फोन जहीर यांच्याकडून फोन घेत कट केला. त्यानंतर काही वेळाने जहीर यांच्या मित्राने पैसे दिल्याचे सांगितले. त्यावेळी रात्रीचे ८ वाजले होते. जहीर यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली नाही. अखेर आज, ११ सप्टेंबरला पोलिसांत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे करत आहेत.

