ओला टॅक्सीचालकाला अडवून कार फोडत केली बेदम मारहाण, पेठेनगरात २ टवाळखोरांचे कृत्‍य

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  ओला टॅक्सीचालकाला अडवून दोघांनी कारची काच फोडत बेदम मारहाण केली. दगडाने मारून त्यांना जखमी केले. ही घटना पेठेनगरच्या डीपीजवळ सोमवारी (१ डिसेंबर) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. छावणी पोलिसांनी दोन्ही टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

दिलीप शाहुबा इंगळे (वय ५६, रा. शाक्यनगर भीमनगर भावसिंगपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी, दोन मुले व एक सून यांच्यासह राहतात. शहरात ओला टॅक्सी (MH 14 HG 6926) चालवतात. रविवारी (३० नोव्‍हेंबर) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दिवसभर टॅक्सी चालवून घराकडे जात असताना पेठेनगरच्या डीपीजवळ आले असता शाक्यनगरकडे जाण्यासाठी वेग कमी करत टॅक्सी कार स्विफ्ट डिझायरने वळण घेतले. त्याचवेळी तेथे उभ्या दोघांनी जोरजोरात कारच्या दरवाजावर मारून व हॅण्डल ओढून दार उघड, असे म्हटले.

दिलीप इंगळे यांनी घाबरून दार उघडले नाही. त्यावेळी दोघांनी कारची समोरील काच फोडली. त्यामुळे इंगळे हे कारमधून उतरले. दोघांनी त्यांना पकडून शिवीगाळ करत हाता चापटाने मारहाण सुरू केली. डोक्यात दगड मारून जखमी केले. त्याचवेळी तिथे उभ्या अन्य दोघांनी मदतीला धावून इंगळे यांची सुटका केली. हल्लेखोर दोघांपैकी जाड व्यक्तीच्या हातात चाकू होता. त्याने तो मारण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही धमकी दिली की, पोलीस ठाण्यात गेला तर तुला जीवे मारू. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर इंगळे यांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. हल्लेखोरांची नावे इंगळे यांना कळली असून, त्यातील एक संकेत जाधव व दुसऱ्याचे नाव करण भांडे असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शकील शेख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software