सहलीच्या दोन्ही बसचा अपघात, कंटेनरने दिली धडक, सुदैवाने बचावले विद्यार्थी, वाळूजजवळ दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सहलीहून परत येणाऱ्या दोन्ही एसटी बसमधील विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका सुसाट कंटेनरने चुकवला. सुदैवाने या अपघातात कोणताही विद्यार्थी व त्यांच्यासोबत असलेले शिक्षक-शिक्षिका जखमी झाले नाहीत. ही घटना वाळूजजवळ बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

एसटी बसचालक रवींद्र बाबुराव पवार (वय ४३, रा. बसस्थानकाशेजारी अकोले ता. अकोले जि. अहिल्यानगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते एसटी बसमध्ये (MH14 MH1079) अकोले येथील कन्या विद्यालयाची सहल घेऊन शेगावला गेले होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास परतत असताना मागे अकोले बसडेपोचे दुसरी बस (MH14 MH1081) होती. ती बस शैलेश उत्तम लेंडे (रा. बसस्थानक शेजारी अकोले ता. अकोले जि. अहिल्यानगर) चालवत होते.

दोन्ही बस छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवेने येत असताना वाळूज देशी फाटा (ता. गंगापूर) येथे रवींद्र पवार यांच्या बससमोर टेम्पो धावत होता. टेम्पोच्या चालकाने त्याचा वेग गतिरोधकावर कमी केल्याने पवार यांनीही बसचा वेग कमी केला. त्यामुळे शैलेश लेंडे यांनीही आपल्या बसचा वेग कमी केला. मात्र त्यांच्या मागे भरधाव असलेल्या कंटेनरने लेंडे चालवत असलेल्या बसला मागून धडक दिली. त्यामुळे लेंडे यांची बस पवार यांच्या बसवर मागून धडकली.

दोन्ही बसचे नुकसान झाले. सुदैवाने बसमध्ये बसलेल्या मुले व शिक्षकांना मार लागला नाही. दोन्ही बस रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यांनी कंटेनरचा नंबर पाहिली असता तो NL 01 AB 4288 असा दिसला. जवळच वाळूज पोलीस ठाणे असल्याने दोन्ही बसचालकांनी कंटेनरचालकाला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दशरथ प्रभु दयाल (रा. रजवापुर, बलरामपुर उत्तर प्रदेश) असे सांगितले. पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध आज, २७ नोव्‍हेंबरला गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अब्दुल रहेमान करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software