कर्णपुऱ्यात अपघाताचा थरार : सुसाट ट्रॅव्हल्स बसने ॲपेरिक्षाला चिरडले, २ महिला भाविकांचा जागीच मृत्यू, २ महिला गंभीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पर्पल खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या सुसाट बसने आज, १९ नोव्‍हेंबरच्या पहाटे सव्वाचारच्या सुमारास कर्णपुऱ्यात अपघाताचा अक्षरशः थरार घडवला. बसच्या डिक्कीच्या दरवाजाने ॲपेरिक्षाला अक्षरशः चिरले. यात दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू, तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

लताबाई राजू परदेशी (वय ४७), आशाबाई राजू चव्हाण (वय ३५, दोघी रा. वाळूज) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे असून, भारती भगवान एकनुरे (वय ४३) आणि मंगल अरुण गव्हाणे (३०, दोघी रा. वाळूज)  गंभीर जखमी झाल्या आहेत. एवढ्या भीषण अपघातातही सीमा शिवाजी काकडे (वय ४५), अनिता सुधाकर मोतकर (वय ५०) व शांताबाई सिताराम बलैया (वय ७०) या तिघी सुखरुप आहेत.  

वाळूज (ता. गंगापूर) येथील लताबाई परदेशी, आशाबाई चव्हाण, मंगल गव्हाणे, भारतीबाई एकनुरे, सीमा काकडे, अनिता मोतकर, शांताबाई बलैया, शोभा वाघ व अन्य दोघे असे १० भाविक सोमवारी (१७ नोव्हेंबर) मध्यप्रदेशातील सिहोर येथे देव दर्शनासाठी गेले होते. दोन व्यक्ती तिथेच मुक्कामी थांबले. आठ महिला भोपाळ- मनमाडमार्गे रेल्वेने छत्रपती संभाजीनगरला आल्या. शोभा सुभाष वाघ (वय ५०) या पुढे श्रीरामपूरला जाण्यासाठी रेल्वेस्टेशनवरच थांबल्या. ७ महिला रेल्वेस्टेशनवरून वाळूजला येण्यासाठी ॲपेरिक्षात (एमएच २० इएफ २५५५) बसल्या.

दुपारी चारच्या सुमारास त्यांची ऑटोरिक्षा कर्णपुरा बसथांब्याजवळ आली असता नगरनाक्याकडून येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या (एमएच ०९, एके ८०१६) उजव्या बाजूचा सामान ठेवण्याचा दरवाजा उघडा होता. तो जवळपास तीन फूट बाहेर आलेला होता. तो ऑटोरिक्षात अडकून ऑटोरिक्षा उलटली. लताबाई यांचे भाऊ बाळू सांडू दुसारे (वय ५०, रा. पळशी बुद्रूक ता. कन्नड) यांच्या तक्रारीवरून ट्रॅव्हल्सचालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (वय २९, रा. कोहीनूर ता. बसवकल्याण जि. बिदर, कर्नाटक) व हेल्पर राज सुनील बैरागी (वय २०, रा. अशोकनगर, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्‍यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय रोकडे करत आहेत. आशा, लता दोघी मैत्रिणी होत्या. दोघींवर बुधवारी वाळूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा चव्हाण यांचे पती चालक असून, लहान मुलगा दहावीत आहे, तर मोठा मुलगा पवन महाविद्यालयीन शिक्षण घेतो, तर लताबाई परदेशी यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची मोठी मुलगी विवाहित असून २९ वर्षांच्या मुलाचे वाळूजमध्ये वेल्डिंग वर्कशॉप आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software