वाळूज सिडको महानगरात अभियंत्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ!; प्रसिद्ध कंपनीत होते कार्यरत...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज सिडको महानगर-१ मधील जय बॉइज होस्टेलच्या एका स्वतंत्र खोलीत राहणाऱ्या ४० वर्षीय अभियंत्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. संतोष बुधा वाघ त्‍यांचे नाव असून, वाळूज एमआयडीसीतील कॉस्मो कंपनीत काम करत होते, असे वसतिगृहातील प्रवेशपत्रावरून समोर येते. ते गेल्या वर्षभरापासून या वसतिगृहात एकटेच राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष वाघ हे मूळचे कल्याण (पूर्व) येथील आहेत. त्यांचे वडील व आई हे डोणदिगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथे वास्तव्यास आहेत. संतोष वाघ यांचे लग्न दहा-बारा वर्षांपूर्वी झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव अमृता आहे. त्‍यांना एक आठ वर्षांची मुलगी आहे. ते कॉस्मोच्या केमिकल विभागात कार्यरत होते, अशी माहिती मिळाली. शुक्रवारी (२७ सप्टेंबर) सकाळी संतोषच्या भावाने त्याला फोन केला, मात्र तो फोन लागत नसल्याने संशय निर्माण झाला. याबाबत भावाने वसतिगृह चालकाला कळवल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच  पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधला असून, या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software