सुसाट कारने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, शेंद्रा एमआयडीसीतील स्कोडा कंपनीजवळील भीषण दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारने रस्‍त्‍याच्या बाजूला गप्पा मारत उभ्या ३ मित्रांना उडवले. यात एका मित्राचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना शेंद्रा एमआयडीसीतील स्कोडा कंपनीमागे शुक्रवारी (२६ डिसेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

जनार्दन धोंडीबा सरोदे (वय ४७, रा. टोणगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. सौरभ बाबुराव कुबेर (वय २६, रा. गेवराई कुबेर ता. जि. छत्रपती संभाजीनगर) व महेश जगन्नाथ वाघमारे (वय २८, रा. शेंद्रा कमंगर, छत्रपती संभाजीनगर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सौरभ सध्या फिनीक्स हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. त्याचा जबाब चिकलठाणा पोलिसांनी नोंदवला. त्यानुसार कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सौरभने पोलिसांना सांगितले, की तो आई, वडील, पत्नीसह राहतो. शेंद्रा एमआयडीसीमधील ऑरीक सिटीत खासगी नोकरी करतो. शुक्रवारी (२६ डिसेंबर) सौरभ व जनार्दन इलेक्ट्रीक स्कुटी बजाज चेतकने (MH 20 HE 2691) शेंद्रा फाट्याकडे येत होते. दुपारी दीडला स्कोडा कंपनीमागे त्यांना महेश भेटला. स्कुटी रोडच्या बाजूला उभी करून त्याच्यासोबत बोलत असताना इर्टिगा कार लिबेर चौकाकडून भरधाव आली.

कारने या तिघांनाही उडवले. तिघेही गंभीर जखमी झाल्याने गावातील रामेश्वर तुळशीराम कुबेर याने व इतरांनी तिघांना घाटी रुग्णालयात दाखल केले. जनार्दन सरोदे यांचा उपचारादरम्यान सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला. कारचालक मदतीला न थांबता कारसह पळून गेला होता. कारचा नंबर तिथल्या लोकांकडून सौरभला कळला. MH 20 GZ 0364  या नंबरची कार होती. या कारचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software