संतापजनक : वाळूज MIDC तील जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी भयग्रस्त, १०-१२ टवाळखोर गेटवर येऊन काढतात छेड, अश्लील टोमणे, विरोध करणाऱ्या शिक्षकांना धमक्या!, दामिनी पथक कुठे आहे?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) :  सध्या नवरात्री सुरू आहे आणि सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. दुसरीकडे याच काळात एक गंभी बाब समोर आली आहे. वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांनी भयग्रस्त सोडले असून, अनेक जणी त्‍यांच्या त्रासाला कंटाळून शाळेत येणेच टाळत आहेत. स्वतः मुख्याध्यापकांनी ही समस्या गांभीर्याने मांडल्यानंतर ही धक्कादायक समोर आली. दामिनी पथकाने तातडीने या शाळेकडे जाऊन टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

रोज सकाळी १०.३० शाळा भरताना, दुपारी १.३० वाजता मध्यान्ह भोजनाच्या सुटीत व संध्याकाळी ४.०० वाजता शाळा सुटतेवेळी १० ते १२ जणांचे टोळके शाळेच्या गेटवर ठाण मांडून असते. या नशेखोरांकडून मुलींना छेडणे, गेट वाजवणे, अश्लील टोमणे मारणे सुरू असते. काही शिक्षकांनी विरोध करण्याचा प्रयत्‍न केला असता या टवाळखोरांनी चक्क धमकावल्याचा प्रकार घडला. आज, २५ सप्टेंबरला तर हद्दच झाली. सकाळी १० .३० वाजता मुख्याध्यापक यशवंत आवारे यांनी या टोळक्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांना अर्धा तास टवाळखोरांनी हैराण करून सोडले. त्यामुळे अवघी शाळा दहशतीखाली आली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने टवाळखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नागरिक संतप्त... 
दरम्यान, आजच्या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून, त्‍यांच्याकडून टवाळखोरांचा बंदोबस्त करताना अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software