सेव्हनहीलजवळील सोलारचे दुकान फोडले, ९८ हजारांची चोरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सेव्हनहिलच्या अतिथी हॉटेलजवळील ज्योतिर्मय कॉम्प्लेक्समधील सोलार साहित्याचे दुकान फोडून चोरट्यांनी ९८ हजार रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणात रविवारी (२८ सप्टेंबर) सिडको पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यश रावसाहेब गोर्डे (वय २२, रा. सुनंदा व्हिला, ऊर्जानगर, बीड बायपास, सातारा परिसर) या तरुण व्यावसायिकाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्याचे ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स सेव्हनहिल, अतिथी हॉटेलजवळ Oscillation Energy नावाचे सोलारचे शॉप आहे. गुरुवारी (२५ सप्टेंबर) संध्याकाळी सहाच्या सुमारास दुकान बंद करून तो घरी गेला.

शुक्रवारी सकाळी नऊला  दुकानात काम करणारा मुलगा अरुण जाधव याने कॉल करून यशला सांगितले, की शॉपचे शटर उचकटलेले दिसत आहे. त्यामुळे यश लगेचच दुकानावर आला. शटर उचकटलेले दिसल्याने चोरी झाल्याची खात्री झाल्याने त्याने पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. चोरट्यांनी एकूण ९८ हजार १३३ रुपयांचे सोलार साहित्य चोरून नेल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलीस अंमलदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना सिल्लोड तालुक्यातील नानेगाव-जंजाळा रस्त्यावरील गट क्र....
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software