सावधान... अहमदाबादहून छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त खवा, मिठाईची तस्करी, विजय ट्रॅव्हल्समध्ये आढळल्या ३०-३० किलोच्या ६ गोण्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरकरांनी आता अलर्ट होण्याची गरज आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्‍त खवा, मिठाई बाजारात आली असून, विजय ट्रॅव्हल्सद्वारे अहमदाबादहून शहरात आलेला भेसळयुक्‍त खवा, मिठाईचा मोठा साठा वेदांतनगर पोलिसांनी जप्त केला आहे. पंचवटी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी कारवाईची माहिती दिली. विजय ट्रॅव्हल्सद्वारे भेसळयुक्त खवा, मेवा, बर्फीची वाहतूक होत असल्याची माहिती वेदांतनगर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे पंचवटी चौकात धाव घेऊन विजय ट्रॅव्हल्सची तपासणी केली. बसमध्ये तीस-तीस किलोंच्या सहा गोण्या आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरसह चाळीसगाव, धुळे, सिल्लोडमध्ये या खव्याचा पुरवठा होणार होता, असे तपासात समोर येत आहे. पोलिसांनी ५९ किलो खवा, शिवशक्ती डिलिशियस स्वीट नावाने ८८ किलो, डेली फ्रेश बर्फी नावाने २८ किलो मिठाई जप्त केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software