- News
- सिटी क्राईम
- धक्कादायक : सातारा परिसरातील अख्खी टेकडीच चोरली!; माजी उपसरपंचाला अटक, काय आहे प्रकरण...
धक्कादायक : सातारा परिसरातील अख्खी टेकडीच चोरली!; माजी उपसरपंचाला अटक, काय आहे प्रकरण...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सातारा परिसरातील गट क्र. २४७ मधील टेकडीच माजी उपसरपंच आयुब खान जब्बार खान पठाण (रा. सातारा) याने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. सातारा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध टेकडी चोरीचा गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शब्बीर जब्बार पठाण (रा. सातारा परिसर) यांनी सातारा पोलीस ठाण्यात आयुब खान याने त्याच्या मालकीच्या जमिनीमधील मोठी टेकडी मुरुम विक्रीसाठी नष्ट केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात असे दिसून आले, की आयुब खानची जवळपास ५ ते ६ एकर शेती असून, तिथेच एक मोठी टेकडी होती. आयुबने जेसीबीने १५ हजारांहून अधिक ब्रास मुरुम, खडी पोखरून ही टेकडीच नष्ट केली. गौणखनिज शासनाची मालमत्ता असते. तिचे परवानगीशिवाय उत्खनन आणि विक्री करणे गुन्हा आहे. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांनी अप्पर तहसीलदार कार्यालयाला कळवले.
४ डिसेंबरला मंडळ अधिकारी शेखर शिंदे यांनी पंचनामा केला. मात्र त्यानंतर महसूल विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार संतोष जाधव यांनी सरकारतर्फे तक्रार दिली. आयुबने एवढी मोठी टेकडी पोखरून मुरुम, खडी कुणाला विकली, किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला? यात रॅकेटचा सहभाग असावा व याच रॅकेटने अन्यत्रही टेकड्या, डोंगर पोखरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने आता तपासाला वेग आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात महसूल विभागाला वारंवार कळवूनही त्यांनी पंचनामा करण्यापलिकडे काहीही हालचाली केल्या नाहीत. उलट दुर्लक्ष केले आहे. यावरून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे या चोरीत हात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यांनी आयुबला का पाठिशी घातले, त्यांचा आर्थिक सहभाग आहे का, याचीही सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 09:21:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...

