धक्कादायक : मुलगी दाखवली, पसंती झाली, पुढे जो थरार घडला, त्याचा २९ वर्षीय तरुणाने स्वप्नातही विचार केला नसेल... वाळूज MIDC त काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्न होत नसलेल्या तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळ्या राज्यभरात सक्रीय झाल्या आहेत. आजवर अनेक तरुणांना लाखो रुपयांना अशाप्रकारे गंडा घालण्यात आला आहे. फसवणुकीची पद्धतही सारखीच असते. वाळूज एमआयडीसीतही असा प्रकार समोर आला आहे. २९ वर्षीय तरुणाला मुलगी, मुलीची आई आणि मध्यस्थी करणाऱ्या दोघांनी रविवारी (३० नोव्‍हेंबर) अत्यंत सुनियोजितपणे ३ लाखांना गंडा घातला आहे. मुलगी दाखवली, पसंती झाली, नोटरीही केली. नंतर लग्नासाठी मुलगी नेत असताना सिनस्‍टाइल कार आडवी आली आणि मुलीला घेऊन गेली...

वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुलगी माया मधुकर शिंदे, तिची कथित आई सविता मधुकर शिंदे (दोघी रा. दुसरबीड ता. सिंदखेड राजा), मध्यस्थी करणारे अरविंद बंडू राठोड (वय ३३, रा. आरंधी डिग्रस, ता. डिग्रस, जि. वाशिम), गुड्डा राठोड अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध अशोक सुदाम बांदल (वय २९, रा. रातंजन, ता. कर्जत, जि अहिल्यानगर) या तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, अशोक हा आई, वडील, भावासह राहतो. शेती करतो. त्याचे अजून लग्न झालेले नाही. लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. दोन महिन्यांपूर्वी त्याची अरविंद राठोड (रा. वाशिम) याच्याशी ओळख झाली.

त्यावेळी तो रातंजन गावाजवळील रस्त्याच्या कामावर सुपरवायझर होता. बरेच वेळा भेटी झाल्यानंतर त्याने आमच्या गावाकडे मुली भेटतात. मी तुला चांगले स्थळ पाहून देतो, असे सांगितले. अशोकने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने एकेदिवशी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगरमध्ये एक मुलगी आहे. तिचे वडील मरण पावले आहेत. ती आई व भावासह राहते व कंपनीत काम करते, असे सांगितले. त्यावर अशोकने त्याला आपण मुलगी बघू, असे म्हटले. त्यावर अरविंदने त्याला मुलीचा फोटो टाकला. तिचे नाव माया शिंदे असल्याचे सांगितले. त्या मुलीला लग्नासाठी तीन लाख रुपये स्त्रीधन म्हणून द्यावे लागतील, असेही सांगितले.

त्यावर अशोकने मुलगी पसंत आल्याने होकार दिला. त्यावरून मुलगी पाहण्याची तारीख ठरली. रविवारी (३० नोव्‍हेंबर) दुपारी १ ला अशोक त्याच्या नातेवाइकांसह बजाजनगरातील आयोध्यानगरात मुलगी बघण्यासाठी आला. अरविंदच्या सांगण्यानुसार सर्व जण मुलीची आई सविता मधुकर शिंदे हिच्या घरी आले. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलगा व मुलीने एकमेकांना पसंत केले. त्यामुळे नोटरी करण्याचे ठरले. अशोक व त्याचे नातेवाइक आणि मुलीकडील मुलीची आई सविता, मध्यस्थी करणारे अरविंद राठोड आणि गुड्डा राठोड होते. सर्वांनी छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयात येऊन एका महिला वकिलामार्फत नवरदेव- नवरीच्या संमतीने लग्न करत असल्याची नोटरी केली. नंतर सर्व जण परत सविताच्या घरी बजाजनगरला आले. तिथे अशोकने फोन पे आणि रोख असे मिळून ३ लाख रुपये दिले. त्यानंतर मुलीच्या आईने सांगितले की, तुम्ही मुलगी माया शिंदे हिला आज सोबत घेऊन जा.

उ‌द्या गावाकडे लग्न लावून घेऊ. त्यामुळे मुलगी मायाला स्विफ्ट कारमध्ये बसवून अशोक व त्याचे नातेवाइक निघाले. लगेच काही अंतरावर गेल्यावर मागून पांढरी आय व्टेंटी कार विनाक्रमांकाची ओव्हरटेक करून समोर गेली आणि त्यांनी लगेचच अशोकच्या कारसमोर कार थांबविली. माया कारमधून उतरून त्यांच्या कारमध्ये बसली. त्या कारमध्ये ४ जण होते. ते मायाला घेऊन गेले. त्यानंतर त्या मुलीला अशोक व त्याच्या नातेवाइकांनी कॉल केले असता तिचा फोन बंद झाला. त्यामुळे अशोक व त्याचे नातेवाइक परत बजाजनगरला आले. जिथे मुलीच्या पाहण्याचा कार्यक्रम झाला, तिथे ना मुलीची आई होती, ना मुलगी, ना मध्यस्थ... मुलीच्या आईचाही फोन बंद आला. त्यावरून अशोकच्या लक्षात आले की लग्नाच्या आमिषाने त्याची फसवणूक झाली आहे. त्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software