धक्कादायक : १२ वर्षीय दिव्यांग मुलाला नारेगावच्या नवजीवन मतिमंद स्कूलमध्ये बेदम मारहाण, मारहाणीचे व्रण पाहून पालक हादरले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : नारेगावच्या नवजीवन मतिमंद स्कूलमध्ये १२ वर्षीय दिव्यांग मुलाला अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण झाली आहे. त्याच्या अंगावर मारहाणीचे व्रण पाहून पालक हादरून गेले आहेत. शाळेने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही. शिक्षिकांनीही अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. अखेर पालकांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आज, ३० ऑक्‍टोबरला गुन्हा दाखल केला आहे. क्रूरपणे चिमुकल्याला मारहाण करणाऱ्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  यात शाळेचीही भूमिका तपासण्याची आवश्यकता असून, शाळेने त्या व्यक्तीला पाठिशी घालण्याचा खटाटोप चालवला आहे का, हेही समोर येण्याची आवश्यकता आहे.

खासगी नोकरी करणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते कुटुंबीयांसह चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मसनतपूर येथील अशोकनगरात राहतात. त्यांचा १० वर्षीय मुलगा दिव्यांग असून तो ३ वर्षांपासून नवजीवन मतिमंद स्कूलमध्ये शिक्षण घेतो. तो १० व ११ सप्टेंबरला शाळेत गेला नव्हता. तो आजी- आजोबांकडे मसनतपूर येथे होता. १२ सप्टेंबरला सकाळी सव्वा दहाला तो स्कूलबसमध्ये बसून शाळेत गेला होता. सायंकाळी पावणेपाचला घरी आला. त्यावेळी आईने त्याच्या अंगावर मारहाण केल्याचे व्रण पाहिले. त्यांनी लगेचच पतीला ही बाब सांगितली. त्यांनी व्हॉट्‌स ॲपवर फोटो मागवून घेतले. नवजीवन मतिमंद स्कूल, नारेगाव येथील शिक्षिका श्रीमती काळे यांना त्यांनी कॉल केला असता त्यांनी उचलला नाही.

त्यानंतर त्यांनी यामिनी काळे व श्रीमती पितळे यांना मुलाचे फोटो व्हॉट्‌स ॲपवर टाकून मुलाला मारहाण झाल्याची माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सांगितले. त्यावेळी त्यांनी ओके असा मेसेज केला. त्यानंतर त्याच दिवशी मुलाला घेऊन त्याचे वडील मिनी घाटीत गेले. डॉक्टरांनी औषधोपचार केले. शाळेकडून नंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मुलाला घेऊन त्याचे वडील पोलीस ठाण्यात आले. त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले. कोणी मारहाण केली, हे मुलाला सांगता येत नाही. १२ सप्टेंबरला सकाळी सव्वादहा ते पावणेपाचपर्यंत तो शाळेतच होता. तिथूनच तो शाळेच्या गाडी बसून घरी आला. त्याला कोणीतरी काहीएक कारण नसताना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software