अजब स्किम सांगून आर.सी. बाफना ज्वेलर्सच्या नावाने घातला ८ लाखांचा गंडा!, छत्रपती संभाजीनगरातील खळबळजनक घटना, भामटा ज्वेलर्समध्ये ऑपरेटर, मग त्याच्याकडे धनादेश आले कसे?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या नावाने अजब स्किम सांगून या ज्वेलर्समध्ये टेलिफोन ऑपरेटर असलेल्या युवकाने आपल्या घरमालकालाच ८ लाख रुपयांचा चुना लावला आहे. जिन्सी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आज, २४ नोव्‍हेंबरला गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्‍हणजे, तक्रारीनुसार त्याने विश्वास बसावा म्हणून आर. सी. बाफना ज्वेलर्सचे चेक दिले होते. त्याच्याकडे हे चेक कसे आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संतोष पुंडलिक बुंदे (वय ३८, रा. वि‌द्यानिकेतन कॉलनी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध प्रविण दगडूबा शहाणे (वय ३९, रा. संजयनगर बायजीपुरा) यांनी तक्रार दिली आहे. ते खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. संतोष बुंदे हा सन २००२ ते २००७ या काळात त्यांच्याकडे भाड्याने राहत होता. त्यामुळे शहाणे आणि त्याच्यात चांगली ओळख झाली होती. तो आकाशवाणी चौकाजवळील आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये टेलीफोन व सीसीटीव्ही ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. त्याने शहाणे यांना कॉल करून सांगितले, की आर.सी. बाफना ज्वेलर्समार्फत एक स्कीम चालू झाली असून त्यानुसार ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ४०० रुपये प्रति दिवस व १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १ हजार रुपये प्रतिदिवस परतावा देण्यात येत आहे. ही स्कीम फक्त विश्वासातील लोकांनाच सांगतो, असे तो म्हणाला.

आम्ही तुम्हाला धनादेश व रोख नगद पावती देऊ. आम्ही तुमचे पैसे इंटर्नल गोल्ड मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. त्यातून जो नफा होईल, तो वाटून घेतो, असे त्याने सांगितले. त्यावर शहाणे यांनी त्याला आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या मॅनेजरसोबत भेट घालून द्यायला सांगितले असता त्याने त्याची काही गरज नाही. मी तिथला जबाबदार व्यक्ती आहे. तुमच्या संपूर्ण पैशाची हमी मी घेतो, असे म्हणून त्याने मॅनेजरसोबत भेटू दिले नाही. त्यामुळे शहाणे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी एकूण ७ लाख ६३ हजार ६०० रुपयेगुगल पेद्वारे पाठविले आणि ४९ हजार २८५ रुपयांच्या दीड तोळा वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या दिल्या. संतोष बुंदे याने ना परतावा दिला, ना पैसे परत केले. त्याच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन घेणे बंद केले. काही दिवसांनंतर त्याचा फोन बंद येऊ लागला. तो घर सोडून कुठेतरी निघून गेला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शहाणे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेऊन बुंदेविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बुंदेकडे ज्वेलर्सचे चेक कसे?
दरम्‍यान, या घोटाळ्यात ज्वेलर्समधील जबाबदार व्यक्तीचाही प्रथमदर्शनी हात दिसून येत आहे. कारण संतोष बुंदे हा टेलिफोन- सीसीटीव्ही ऑपरेटर म्‍हणून ज्वेलर्समध्ये कामाला होता. मग त्याच्याकडे आर. सी. बाफना ज्वेलर्सचे एचडीएफसी बँकेतील बंद खात्याचे चेक कसे आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याने हे चेक देऊनच शहाणे यांचा विश्वास संपादन केल्याने या फसवणुकीत ज्वेलर्समधील आणखी कोण कोण सहभागी आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software