घरमालकाचा भाडेकरू महिलेवर लैंगिक अत्याचार, रांजणगाव शेणपुंजीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे किरायाचे घर खाली कर, नाहीतर जीवे मारतो, अशी धमकी देत घरमालकाने २७ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या तक्रारीची सध्या चौकशी केली जात आहे.

हनुमाननगर परिसरात आईसोबत वास्तव्यास असलेली विवाहिता पतीपासून वेगळी राहते. घटनेच्या दिवशी तिची आई बाहेर गेल्याने ती घरी एकटी होती. घरमालक अर्जुन पाखरे हा भाडे मागण्याच्या कारणावरून घरात शिरला. त्याने सुरुवातीला अश्लील वर्तन केले व विरोध केल्यावर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेवर अत्याचार केला असल्याची तक्रार नोंदवली गेली आहे. या प्रकरणी अर्जुन पाखरे याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software