कारचालक अन्‌ सोबतच्या महिलेचा एपीआय कॉर्नरवर राडा; सानिया मोटर्सच्या कर्मचाऱ्याला भररस्‍त्‍यात बेदम मारहाण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एपीआय कॉर्नरजवळील सागर लॉन्ससमोर कारचालक व त्याच्यासोबतच्या महिलेने राडा केला. भररस्‍त्‍यात सानिया मोटर्सच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत कपडे फाडले. सिडको एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात महिलेला अभय दिले असून, केवळ कारचालकाविरुद्धच गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्याने तक्रारीत महिलेनेही मारहाण केल्याचे म्हटले आहे.

मनेश कल्याण घोरपडे (वय २५, रा. अंबिकानगर गल्ली नं. ४ मुकुंदवाडी) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो एपीआय कॉर्नर सागर लॉन्सच्या बाजूला सानिया मोटर्स येथे ७ वर्षांपासून कामाला आहे.  तो चारचाकी वाहनांची कोटींग करून ती गाडी शोरूमला आणून ठेवण्याचे काम करतो. मंगळवारी (३० सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास मनेश शो रूमची नवी नेक्सॉन कार ही सानिया मोटर्समध्ये आणून ठेवत असताना सागर लॉन्स येथे दांडियाचा कार्यक्रम असल्याने गाड्यांची गर्दी झाली होती.

गाडीखाली उतरून गाडीसाठी रस्ता मोकळा करत असताना कारचालक (MH 20 HH 4272) व त्यांच्यासोबत एक महिला असे गाडीखाली उतरले. मी कोण आहे तुला माहीत आहे का, असे त्याने म्हटले. अश्लील शिवीगाळ करून तू माझी हिस्ट्री काढ, मग कळेल तुला मी कोण आहे, असे धमकावले. त्याच्या सोबतच्या महिलेनेही शिवीगाळ करून मारहाण केली. त्या व्यक्तीने मनेशचे कपडे फाडून चष्मा फोडला.

हा प्रकार पाहून सानिया मोटर्स येथे काम करणारा निरंजन राठोड हा भांडण सोडविण्यास आला असता त्यालाही त्या दोघांनी हाताचापटांनी मारहाण केली. त्याच्या पाठीवर मारून जखमी केले. मनेशने सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनेशवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अधिक तपास पोलीस अंमलदार चंदनसिंह उसारे करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software