पोलीस एक टोळी अटक करतात, लगेच दुसरी तयार होते, छत्रपती संभाजीनगरात ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे किती खोलवर?, पडेगावमध्ये ३ तस्करांना अटक, ६१ ग्रॅम एमडी ड्रग्‍ज जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील ड्रग्जतस्करीचे जाळे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आतापर्यंत पोलिसांनी शेकडो कारवाया केल्या, पण एक टोळी पकडली की दुसरी टोळी तयार होते. आताही शहर पोलिसांनी ३ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी (२४ नोव्‍हेंबर) दुपारी १२ च्या सुमारास पडेगाव रोडवरील मैदानावर करण्यात आली. इंदूरहून धुळे, मालेगावमार्गे छत्रपती संभाजीनगरात ड्रग्ज आणले जायचे.

आबूज अमर चाऊस (वय ३०, रा. सहेदा कॉलनी), मोहम्मद इम्रान मोहम्मद यासीन (वय ३५, रा. कटकट गेट) आणि समीर चांद खान ऊर्फ पप्पू (वय ३४, रा. रहेमानिया कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी ही कारवाई केली.

गुप्त माहितीनुसार कार (एमएच ०५ एएक्स ३०३६) शहरात येताच पडेगावजवळ पकडण्यात आली.  कारमध्ये ६१ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. कार जप्त करण्यात आली. तस्करांनी पोलिसांना सांगितले, की कॉलेजचे विद्यार्थी त्यांचे ग्राहक आहेत. टेलिग्राम, स्नॅपचॅटद्वारे त्यांच्याशी संपर्क करून ड्रग्जची ऑर्डर स्वीकारली जाते. ४ महिन्यांपासून तिघेही ड्रग्जची तस्करी करायचे. मोहम्मद इम्रान वाहनचालक असून, समीर ऊर्फ पप्पू खान गॅरेजवर काम करतो. एकूण १४ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांना छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software