आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गरवारे स्टेडियमवर महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना निकाल ऐकायला शेकडोंची गर्दी जमली होती. याच गर्दीला संधी मानून चोरटे सक्रीय झाले. चार जणांच्या सोनसाखळ्या, सोन्याची लॉकीटे आणि रोकड असा एकूण १० लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे निकालाची उत्सुकता या चौघांना फारच महागात पडली.

प्रशांत बाबुलाल जैस्वाल (वय २६, रा. संत रविदास कॉलनी सातारा परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते एचडीएफसी बँकेच्या स्टेशन रोड शाखेत होम लोन डिपार्टमेंटला नोकरी करतात. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास महापालिका निवडणुकीचा निकाल असल्याने ते गरवारे स्टेडियमवर आले होते. निकाल ऐकून बाहेर निघत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास गरवारे स्टेडियम गेटमधून येत असताना त्यांच्या गळ्यात एक तोळ्याची सोन्याची चैन होती. गेटमधून बाहेर आल्यावर गर्दीत मागून एक अनोळखी व्यक्ती आला. तो काही एक कारण नसताना जैस्वाल यांना ढकलू लागला. जैस्वाल यांनी मागे वळून पाहिले असता त्याने जैस्वाल यांच्या गळ्यातील चैन ओढली.

जैस्वाल यांनी त्याला तेथेच पकडले. मात्र गर्दी असल्याने त्याने चैन दुसऱ्या व्यक्तीच्या हाती दिली आणि तो दुसरा व्यक्ती सोन्याची चैन घेऊन पळून गेला. ज्याला पकडले होते, त्याच्या खिशात दुसरी चैन तोडलेल्याचा तुकडा मिळून आला. त्याला जैस्वाल यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. त्याचे नाव सुभाष लक्ष्मण गुंजाळ (वय २०, रा. पेठ बीड पोलीस ठाणे पाठीमागे नागोबा गल्ली बीड) असे सांगितले.

तेथे जैस्वाल यांना कळले, की नरेंद्र आसाराम आव्हाड (वय ३३, रा. मयूर पार्क) यांचे ३० ग्रॅम वजानाचे सोन्याचे लॉकेट, सात्विक श्रीराम टेपाळे (वय ३४, रा. शिवाजी पुतळ्यासमोर नारेगाव) यांचे २७ ग्रॅम वजनाचे लॉकेट व त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये, शुभम जनार्धन गोंडे (वय २६, रा. नारेगाव भाटनगर) यांचे ३० ग्रॅम वजनाचे गळ्यातील लॉकेट गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने चोरले आहेत. सर्वांच्या ऐवजाची एकूण किंमत ९ लाख ८४ हजार रुपये भरली. पोलिसांनी संशयित सुभाष गुंजाळसह त्याच्या पळून गेलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश तांबोरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software