महापालिकेची नवी तयारी : छत्रपती संभाजीनगर शहरात आणखी १२ उड्डाणपूल, २ भुयारी मार्ग... महावीर चौक ते पडेगावदरम्यान डबलडेकर उड्डाणपूल!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहरातील प्रमुख ५ रस्त्यांवरील साडेपाच हजार अतिक्रमणांवर बुलडोझर चालवल्यानंतर आता महापालिकेने या रस्त्यांच्या विकासासाठी पुढचे पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. महापालिकेने नेमलेल्या पेडेको एजन्सीने २ महिने अभ्यास करून रस्ते विकासाचा प्राथमिक स्तरावरील डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार केला असून, तो आता शासनाला सादर करण्यात येणार आहे. या डीपीआरनुसार शहरात नवे १२ उड्डाणपूल आणि २ भुयारी मार्ग करण्याचे सूचवले आहे. महावीर चौक ते पडेगाव दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची शिफारसही केली आहे.

गुरुवारी या डीपीआरचे पेडेको एजन्सीने ‘स्मार्ट सिटी' कार्यालयात सादरीकरण केले. रस्ते रुंदीकरणासाठी महापालिकेने पडेगाव-मिटमिटा रोड, पैठण रोड, महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा हा बीड बायपास रस्ता, जालना रोड, जळगाव रोड या रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि बाधित मालमत्ता हटवल्या. अत्यंत आक्रमकपणे पोलिसांची मदत घेऊन राबवलेल्या मोहिमेला केवळ हर्सूलमध्ये ब्रेक लागला. ज्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली गेली, तिथेही पुन्हा हळूहळू अतिक्रमणे थाटली जात आहेत. त्‍यामुळे महापालिकेने वेळीच रस्ते विकासाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. या रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केंद्र शासन आणि राज्य शासनाशी केलेल्या चर्चेनंतर डीपीआर तयार करण्यासाठी पेडेको या एजन्सीची नियुक्ती केली. या एजन्सीने आता डीपीआर तयार केला आहे. एजन्सीचे प्रतिनिधी विजय पवार यांनी हा प्रस्ताव सादर केला.

प्रस्तावात या शिफाशी...
-महावीर चौक ते पडेगाव दरम्यान डबलडेकर उड्डाणपूल गरजेचा.
-नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट भुयारी मार्ग हवा.
-जालना रोडवर सध्या ४ ठिकाणी उड्डाणपूल, आणखी ३ उड्डाणपुलांची गरज. यात हायकोर्टच्या सिग्नलजवळ, मुकुंदवाडी चौक आणि धूत हॉस्पिटल ते सुखना नदीचा पूल या ३ ठिकाणी उड्डाणपूल उभारावे.
-बीड बायपासवर सध्या ३ ठिकाणी उड्डाणपूल, आणखी ३ ठिकाणी उड्डाणपूल हवेत.
-जळगाव रोडवर गरवारे कंपनी, डॉ. आंबेडकर चौक आणि अहिल्यादेवी होळकर चौक या ३ ठिकाणी उड्डाणपूल गरजेचे.
-पैठण रोडवर अस्तित्वात असलेला रेल्वेस्टेशनचा उड्डाणपूल महानुभाव आश्रमापर्यंत वाढवावा.
-नक्षत्रवाडी ते बिडकीनदरम्यान डबल डेकर उड्डाणपूल तयार करावा.
-नगरनाका ते पडेगाव उड्डाणपूल ६ लेनचा असावा.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software