दोन्ही मुलीच झाल्याने सतत छळ, २८ वर्षीय नाजियाने गळफास घेऊन संपवल्या यातना!, नारेगावची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाजिया सय्यद आमेरोद्दीन (वय २८, रा. नारेगाव) हिच्या आत्‍महत्‍येप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. गुरुवारी (२७ नोव्‍हेंबर) रात्री नाजियाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली होती. दोन्ही मुलीच झाल्याने व माहेरच्यांकडून पैसे आणत नसल्याने तिचा छळ केला जात होता.

नाजियाचा विवाह २०१८ मध्ये आमेरोद्दीन सय्यद आसेफोद्दीन याच्यासोबत झाला होता. दोन्ही मुलीच झाल्याने तिचा पती व सासरच्यांकडून छळ सुरू झाला. माहेरहून पैसे आणायला सांगायचे. मात्र माहेरची परिस्थिती नाजूक असल्याने ती नकार देत होती. यातूनच तिला अनेकदा घराबाहेरही काढण्यात आले होते. तिने सप्टेंबर महिन्यात पोलिसांत तक्रारही दिली होती. पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर नातेवाइकांनी मध्यस्थी केल्याने ती पुन्हा नांदायला गेली. मात्र पुन्हा त्रास देणे सुरू झाले. गुरुवारी (२७ नोव्हेंबर) नाजिया मुलींसह घरी असताना आमेरोद्दीनने पुन्हा तिला मारहाण केली. त्यानंतर नाजियाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. नाजियाचे भाऊ शेख समीर शेख अमीर यांच्या तक्रारीवरून आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

Latest News

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाडळसा (ता. गंगापूर) येथे उपसरपंच अरुण सोनवणे याने साथीदारांसह मिळून सार्वजनिक बौद्ध समाजमंदिरावर बुलडोझर चालवले....
घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software