सासू-सुनेचं नव्हे, जणू होतं मायलेकीचं नातं... सासूच्या निधनाचे वृत्त कळताच सुनेचाही हार्टॲटॅकने मृत्यू, छत्रपती संभाजीनगर शहरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या सासूच्या निधनाचे वृत्त समजताच सुनेचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील वेदांतनगर भागात आज, ४ नोव्हेंबरला घडली. दोघी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या पत्नी व आई होत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश रूपचंद परदेशी (रा. वेदांतनगर) यांच्या आई रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय ९६) दीपावलीनिमित्त नाशिकला भावाकडे गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी एकला सुरेश परदेशी हे घरी असताना आईच्या निधनाची वार्ता त्यांना भावाने कळवली. यानंतर नाशिकला तातडीने निघायचे असल्यामुळे तयारीला लागलेले असतानाच पत्नी विजया सुरेश परदेशी (वय ६२) यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घाटी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. .

या दोघींमध्ये आई, मुलीप्रमाणे जिव्हाळ्याचे नाते असल्यामुळे हा धक्का त्यांना सहन  न झाल्याचे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले. रुक्मिणीबाई परदेशी यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.  विजया परदेशी यांच्यावर बुधवारी (३ ऑक्‍टोबर) दुपारी तीनला पुष्पनगरी स्मशानभूमीत (मध्यवर्ती बसस्थानकाजवळ) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. सुरेश परदेशी हे भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त अधिकारी असून, निवृत्तीनंतर ते विद्यापीठात सुरक्षा अधिकारी म्हणून रूजू झाले होते. २०२० मध्ये ते निवृत्त झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software