LCB ची कुंभेफळमध्ये मोठी कारवाई : ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा, ९ जणांना अटक, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभेफळ येथील ड्रीम सिटी सोसायटीतील रो हाऊस क्र. १४ मध्ये बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाइन गेमिंग जुगार अड्ड्यावर छापा मारून ९ जणांना ताब्यात घेतले. लॅपटॉप, टॅब, मोबाइलसह ८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २४ तास देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ४० खेळांसह कॅसिनो गेम्सद्वारे हा डिजिटल जुगार खेळवला जात होता. नऊही संशयितांना गुरुवारी (२० नोव्‍हेंबर) न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली की, करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभेफळ येथील अशोक विठ्ठल मुंढे यांच्या ड्रीम सिटी सोसायटीतील रो हाऊस क्र. १४ मध्ये काही जण ऑनलाइन गेमिंग जुगारासाठी लोकांकडून ऑनलाइन पैसे घेऊन ऑनलाईन गेमिंग जुगार खेळत व खेळवत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा मारण्याचे नियोजन केले.

WhatsAppImage2025-11-20at8.38.01PM1

पथकाने ड्रीम सिटी सोसायटीतील रो हाऊस क्र. १४ मध्ये अचानक छापा मारला असता तेथे एकूण ९ जण इंटरनेटच्या माध्यमातून लॅपटॉप, मोबाईलच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळे प्रकारचे ऑनलाईन गेम खेळण्यास प्रोत्साहीत करून त्यांना गेमींगमध्ये पैसे जिंकण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत होते. ते बेकायदेशीररीत्या वेगवेगळ्या क्रिकेट, फूटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बेसबॉल आदी खेळांवर पैसे लावून जुगार खेळत व खेळवित होते. पोलिसांनी या ठिकाणावरून ५ लॅपटॉप, १ टॅब, २२ मोबाइल, ६ वेगवेगळ्या कंपन्यांचे सीमकार्ड, ४ क्युआर कोड स्कॉनर, २१ वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, १ मोटारसायकल व ३५ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ८ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

WhatsAppImage2025-11-20at8.38.01PM

यांना केली अटक
सूरज किरणसिंग पचलोरे (वय २६, रा. एन ७ सिडको पोलीस कॉलनी), प्रणव प्रल्हाद मानकर (वय २६, रा. सिडको एन ६, आविष्कार कॉलनी), राहुल शिवनाथ डनसेना (वय २०, रा. छत्तीसगढ), सुरत कुमार यादव (वय २७, रा. छत्तीसगढ), रोहन बिशमकुमार (वय २७, रा. छत्तीसगढ), शहादाब खान वकील खान (वय २८, रा. छत्तीसगढ), महेंद्र विनायक नवग्रह (वय २६, रा. स्वामी विवेकानंदनगर, हडको), प्रतिक नितिन मोरे (वय २६, रा. प्रतापगडनगर एन ९ सिडको), सौरभ राजेंद्र महाले (वय २७, रा. भवानीनगर जुना मोंढा छत्रपती संभाजीनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मास्टरमाइंड परराज्यात?
संशयितांनी सांगितले, की हे जुगार साहित्य त्यांच्या बाहेर राज्यातील साथीदाराने पुरवले असून तोच ऑनलाइन फसवणुकीचा जुगार आमच्याकडून चालवुन घेत आहे. आम्ही त्याच्यासाठी काम करतो, असा दावा संशयितांनी केला आहे. पथकाने सर्वांना करमाड पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. सर्व संशयित उच्चशिक्षित असून, सूरज पचलोरे बीपीएड पदवीधारक असून, पोलीस अंमलदाराचा पुतण्या आहे. प्रणव मानकर मेकॅनिकल अभियंता, महेंद्र नवग्रह हा बीएस्सी फिजिक्सचा विद्यार्थी आहे. सौरभव महाले हा छायाचित्रकार आहे. सर्व जण टक्‍केवारीवर काम करायचे. शहादाब खान हा रॅकेटच्या सूत्रधारांसोबत संपर्क असायचा, असे सूत्रांनी सांगितले. वर्क फ्रॉम होमचे काम सांगून त्यांनी रो हाऊस भाड्याने घेतले होते. रो हाऊस रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अशोक मुंढे यांचे आहे. सर्व संशयितांनी त्यांना सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असल्याचे सांगितले होते. दिवसाला ते ३ ते ४ लाख रुपयांची उलाढाल करायचे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, दिलीप चौरे, पोलीस अंमलदार विठ्ठल डोके, सचिन सोनार, रवींद्र लोखंडे, शिवानंद बनगे, दीपक सुरोशे, अशोक वाघ, विष्णू गायकवाड, अनिल चव्हाण, अंगद तिडके, नीलेश कुडे, पोलीस अंमलदार महेश बिरुटे, अनिल काळे, समाधान दुबिले, सनि खरात, योगेश तरमळे, सायबर विभाग गणेश घोरपडे, योगेश मोईम,राजेश राठोड, मुकेश वाघ, गणेश खरात, सोपान डकले, सचिन ढवळे यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...

Latest News

रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले... रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
https://www.instagram.com/reel/DVqQgyaDV0t/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचा रिलस्टार अरुण तुपे (वय २५, रा. बालाजीनगर) मंगळवारी (१० मार्च) नेहमीप्रमाणे...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software