भरवस्तीतून दुचाकी गायब करणारा पोलिसांनी २४ तासांतच पकडला!; जवाहरनगर पोलिसांची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : २२ सप्टेंबरला दुपारी दुचाकी चोरीला गेली. २३ सप्टेंबरला दुचाकीमालकाने जवाहनरनगर पोलिसांत तक्रार केली अन्‌ त्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी दुचाकीचोराच्या मुसक्या आवळल्या आणि चोरलेली दुचाकी जप्त केली. ही घटना विष्णूनगरात घडली होती. एमजीएम हॉस्पिटलसमोर चोरावर पोलिसांनी झडप घातली.

दिनेश लक्ष्मी मुखिया (वय ३०, रा. जाधववाडी हर्सूल) असे संशयित चोराचे नाव आहे. पांडुरंग कनीराम (जाधव वय ५५, रा. जयभवानीनगर मुकुंदवाडी) हे २२ सप्टेंबरला दुपारी दीडला विष्णूनगरमध्ये गल्ली नं. ५ मध्ये केबलच्या कामासाठी गेले होते. त्यांची ५० हजार रुपयांची मोटारसायकल (क्र. एमएच २०  बीबी १६६७) चोरट्याने लांबवली. २३ सप्टेंबरला त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी सीसीटीव्ही फूटेज व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने चोराचा शोध सुरू केला. संशयित चोरट्याची माहिती समोर येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना कळवले.

त्यांच्या आदेशाने पोलीस अंमलदार दत्ता वानखेडे, मारोती गोरे, ज्ञानेश्वर शेलार यांच्या पथकाने, संशयित जिथे उभा होता, तिथे एमजीएम हॉस्पिटलसमोर धाव घेतली. संशयित दिनेशला ताब्‍यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दत्ता वानखेडे, मारोती गोरे, ज्ञानेश्वर शेलार यांनी पार पाडली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software