दुचाकीला धक्का लागल्याचे निमित्त करून दोन टवाळखोरांनी डॉक्टरला लुटले!; टिळकनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कारचा दुचाकीला धक्का लागल्याचे कारण करून दोन टवाळखोरांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला थांबवून बेदम मारहाण केली. त्याचा मोबाइल हिसकावून ऑनलाइन ५ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले. जखमी डॉक्टरने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली असता पोलिसांनी ज्या खात्यात पैसे गेले, ते खाते निष्पन्न करून दोन्ही टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या.

कमलेश प्रशांत धोंगडे (वय २५) व रमण दत्तात्रय पांडे (वय २९, दोघे रा. अरिहंतनगर) अशी संशयितांची नावे आहेत. डॉ. अनिकेत चव्हाण (वय २४, रा. प्रतापनगर) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. डॉ. चव्हाण हे मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री घरी परतत होते. साडेनऊच्या सुमारास टिळकनगरमधून जाताना कमलेश व रमणने दुचाकीला धक्का लागल्याचे सांगत कार थांबवली. डॉ. चव्हाण यांच्यासोबत वाद सुरू केला. डॉ. चव्हाण यांना मारहाण करून जखमी केले. कारचे नुकसान करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. त्यांचे खिसे तपासून मोबाइल हिसकावला. मारण्याची धमकी देत ऑनलाइन पाच हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.

त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या सूचनेवरून पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरू केला. ज्या खात्यावर पैसे ऑनलाइन ट्रान्सफर झाले, ते खाते निष्पन्न होताच कमलेश व रमणची ओळख पटली. कमलेश चालक असून, त्याच्याविरुद्ध याआधी पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. त्याला अटकही झाली होती. सध्या तो जामिनावर आहे. रमण खासगी काम करतो. अधिक तपास सहायक फौजदार रमेश जाधव करत आहेत.

मंगळसूत्र हिसकावले...
खासगी शाळेवरील शिक्षिका सुरेखा गवई या मध्यवर्ती बसस्थानकात पैठण -बुलडाणा बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. मंगळवारी (११ नोव्‍हेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. क्रांती चौक पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गवई या पैठण -बुलडाणा बसमध्ये चढत होत्या. त्यांचे ५ ग्रॅमचे मंगळसूत्र व ४० सोन्याचे मणी चोरट्याने लांबवले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software