चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रारदार कुटुंबाचा पोलिसांसोबत राडा!; पोलिसांनी केले गंभीर आरोप, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या कुटुंबाचा पोलिसांसोबत राडा झाला. यावेळी तक्रारदार कुटुंबावर पोलिसांनी गंभीर आरोप केले असून, या कुटुंबाने अश्लील शिवीगाळ, धमक्या, धक्काबुक्की केल्याची तक्रार सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात चिकलठाणा पोलीस ठाण्यातील अंमलदार सुरेश सौंदरमल यांनी केली आहे. ही घटना सोमवारी (१२ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

महिला पोलीस अंमलदार सुरेखा सौंदरमल यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की सोमवारी ड्युटीवर असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास कचरू रामभाऊ देहाडे, करण कचरू देहाडे व सुमन कचरू देहाडे हे पोलीस ठाण्यात आले. कचरू दारू पिलेला होता. पोलीस विचारपूस करत असताना त्याने हुज्जत घालणे सुरू केले. त्याचा मुलगा करण आणि पत्नी सुमन हेही मोठमोठ्याने ओरडू लागले. पोलीस त्याला समजावून सांगत असताना करण देहाडे म्हणाला, की तुम्ही आमची तक्रार घेत नाही. तुम्ही पैसे खाणारे लोक आहेत. कचरू देहाडे याने पोलीस उपनिरीक्षक राठोड यांना धक्काबुक्की करत ढकलून दिले व अश्लील शिवीगाळ केली.

तुम्ही सर्वांनी पैसे खाऊन माझी तक्रार घेत नाही, असे म्हणत पोलिसांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ करू लागला. पोलीस ठाण्याच्या आवारात आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा आणला. संध्याकाळी सातला करण देहाडे व त्याची आई सुमन देहाडे हे पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी करण देहाडे याने पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये जाऊन मोठ्याने ओरडून म्हणाला, की तुम्ही आमची तक्रार घेतली नाही. मी तुमच्या विरोधात मला मारहाण केल्याची खोटी तक्रार करतो. त्याची आई सुमन सुद्धा मोठ-मोठ्याने ओरडून बोलू लागली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी कचरू रामभाऊ देहाडे, करण कचरू देहाडे व सुमन कचरू देहाडे (तिघे रा. गिरनेरा तांडा ता. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल कला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software