छत्रपती संभाजीनगरात तोतया पोलीस पुन्हा अवतरले!, दोघांना लुटले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा तोतया पोलीस अवतरले आहेत. दोन तोतया पोलिसांनी अर्ध्या तासात दोन वृध्दांना लुटले असून, सातारा व जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी ११:३० ते १२ दरम्यान घडल्या.

श्रीकांत देशपांडे यांच्या तक्रारीनुसार, ते संग्रामनगर उड्डाणपुलाजवळून जात होते. त्यांना अडवून दोघांनी पोलीस असल्याचे सांगत पुढे गुन्हे घडत असून दागिने काढून ठेवा, असे सांगत हातचलाखीने सोन्याची १ तोळ्याची अंगठी व २ तोळ्यांची सोनसाखळी लंपास केली. त्याआधी गोपाल कुलकर्णी (वय ३०, रा. एन ६) उल्कानगरीतून दुचाकीने घरी जात होते. शास्त्रीनगरात दोन तोतया पोलिसांनी अडवले. आम्ही पोलीस आहोत, दागिने काढून बॅगमध्ये ठेवा, असे म्हणत ६ ग्रॅमची सोन्याची व ७ ग्रॅमची चांदीची अंगठी काढून घेत पोबारा केला. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software