- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरांचा कहर : दोघे दुचाकीने येतात, मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकतात, ३ मह...
छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरांचा कहर : दोघे दुचाकीने येतात, मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकतात, ३ महिलांवर ओढवले संकट!, काही तासांच्या अंतराने चोऱ्या, पोलिसांना जणू आव्हानच दिले!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात मंगळसूत्र चोरांनी अक्षरशः कहर केला असून, मंगळवारी (९ सप्टेंबर) एकाच दिवशी काही तासांच्या अंतरात मोटारसायकलस्वार २ चोरट्यांनी ३ महिलांचे मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. सातत्याने मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत असताना पोलीस चोरांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांचे धाडस चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी पोलिसांना आव्हानच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. ३ चोऱ्यांत एकूण साडे तीन लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले आहेत.
सोनाली राहुल कोठारी (वय ३८, रा. लालीत्य नाभराज अपार्टमेंट, उस्मानपुरा, सिटी केअर हॉस्पीटलसमोर) यांनी पती राहुल कोठारी यांच्यासह क्रांती चौकात येऊन तक्रार दिली. त्यांची उस्मानपुऱ्यात मोबाईलची दुकान आहे. मंगळवारी (९ सप्टेंबर) त्या सिटी चौक पोलीस ठाण्यातून पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम करून घरी जाण्यासाठी रविवार बाजार सम्राट चौक येथून स्कुटीने सिल्लेखान्याकडे एकटी जात होत्या.
पार्वतीबाई प्रल्हाद राठोड (वय ७२, रा. सह्याद्रीनगर मनन अपार्टमेंटमागे, पुंडलिकनगर रोड) यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. मंगळवारी सकाळी सातला त्या व त्यांचे पती राहत्या घरून मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. परतत असताना दौलत बंगल्याच्या मागील गल्लीत दोन अनोळखी व्यक्ती हे लाल मोटारसायकलीवर मागून पार्वतीबाई यांच्याकडे आले. मोटारसायकलीवर समोर बसलेल्याने त्यांना विचारले, की या बिल्डिंगचे नाव काय आहे.
पार्वतीबाई काही बोलणार त्याआधीच मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून दोघे गजानन महाराज मंदिराकडे पळून गेले. दोघांनी हेल्मेट घातलेले होते. दोघांनीही काळ्या व निळ्या रंगाचे कपडे घातलेले होते. त्यांनी १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याचे तक्रारीत पार्वतीबाई यांनी म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव करत आहेत.
घटना तिसरी विस्ताराने...
अर्चना चंद्रकांत शेळके (वय ४४, रा. वात्सल्य निवास, भगतसिंगनगर, गारखेडा परिसर) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचे पती बीडला तहसीलदार आहेत. मंगळवारी संध्याकाळी सहाला त्या घरातून सासू मंगला एकनाथ शेळके (वय ६०, रा. मुथियान रेसिडेन्सी श्रीकृष्णनगर गारखेडा परिसर) यांना भेटायला ॲक्टिव्हाने (MH 20 GT 5994) भेटायला गेल्या होत्या.
तिथून साधारण साडेसातला घरी जायला निघाल्या. उद्योग विनायक अपार्टमेंटसमोर आल्या असता मागून आलेल्या मोटरसायकलवरील दोघांपैकी मागे बसलेल्याने अर्चना यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि दोघे खिवंसरा मेफेअर चौकाकडे जोरात निघून गेले. त्यांनी ९० हजारांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करत आहेत.

