चेतक घोडा चौकात पती-पत्‍नीत भांडण, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जय विश्व भारती कॉलनीजवळील चेतक घोडा चौकात पती-पत्‍नीचे भांडण झाले. पतीने मारहाण करत डोक्यात दगड घालून पत्नीला जखमी केले. ही घटना मंगळवारी (७ जानेवारी) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. जवाहरनगर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गजानन सुभाष चन्ने (रा. हनुमाननगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. मुक्ता गजानन चन्ने (वय ३७, रा. शिवशंकर कॉलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचे पती घरगुती भांडणाच्या कारणामुळे ४ महिन्यांपासून वेगळे त्यांच्या आईकडे हनुमाननगरात राहतात. ते दारू पिण्याच्या सवयीचे असून, नेहमी मुक्ता यांना दारू पिऊन त्रास देतात. मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चेतक घोडा, श्रीराम मंदिराजवळून मुक्ता व त्यांचा मुलगा कामाला जात असताना तिथे पतीने त्यांना गाठले. तू माझ्याविरुद्ध केस का टाकली, तू घरी का येत नाही, असे म्हणून पतीने त्यांना शिवीगाळ करुन हातचापटाने मारहाण केली. रस्त्यावरचा दगड डोक्यात मारला. तू आली नाहीस तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर मुक्ता यांनी घाटी रुग्णालयात उपचार घेऊन जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार मनोज उईके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software