टीव्ही सेंटर भागात भीषण आग; आधी धुराचे लोट, मग रौद्रारुप धारण...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : टीव्ही सेंटर भागात शनिवारी (१८ ऑक्‍टोबर) सकाळी ८ वाजता भीषण आगीने सर्वांच्याच हृदयाचा थरकाप उडवला. अमोदी कुशनच्या दुकानाला आग लागली, ती वाढत जाऊन रौद्ररुप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या मदतीने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेने खळबळ उडाली. दुकान बंद असल्याने जीवितहानी टळली.

अमोदी कुशनच्या दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याने नागरिकांनी तातडीने अग्‍निशमन दलाला कळवले. अग्‍निशमन दलाची गाडी येईपर्यंत आगीनी रौद्ररुप धारण केले. आगीचे लोळ उठले. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबांच्या साह्याने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर तासभर कुलिंगचे काम करण्यात आले. दुकानातील गाद्या, कुशन तयार करण्याचे साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे दुकानमालकाचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझविल्यानंतरही धुराचे लोट बाहेर येत होते. उपअग्निशमन अधिकारी हरिचंद्र पवार, जवान अशोक पोटे, शिवाजी काकडे, तनवीर शेख, विक्रम भुईगल, गजानन गावंदे, शंकर दुधे यांनी आग विझविण्याची कामगिरी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software