मुकुंदवाडीत पुन्हा टोळीयुद्ध भडकले!; दोन गट भिडले, चाकूने वार करत सुटले..., १ गंभीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलीस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडीत गावगुंडांना वेसन घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. गुरुवारी (२० नोव्‍हेंबर) रात्री टोळीयुद्ध भडकले. गुंडांचे दोन गट भिडले. कुख्यात गुन्हेगाराने दुसऱ्या गटातील तरुणावर चाकूचे सपासप वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (२१ नोव्‍हेंबर) मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करून या कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे.

संकेत किशोर लामदांडे (वय २२, मुकुंदवाडी गाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो मोक्का कायद्याखाली जेलमध्ये होता. काहीच दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला आहे. बाहेर येताच त्याने पुन्हा थरार घडला. शुभम रामकिसन जगताप (वय २२, रा. मुकुंदवाडी) असे जखमीचे नाव आहे. शुभमच्या जबाबानुसार, तो गुरुवारी रात्री नऊला गावातीलच संतोषीमाता मंदिराजवळून जात होता. संकेतने त्याला अडवून नशेच्या बटण गोळीसाठी पैसे मागितले. शुभमने नकार दिल्याने संतप्त होत संकेतने खिशातून धारदार चाकू काढून त्याच्या छाती व पाठीत वार केले. जीव वाचविण्यासाठी शुभम पळू लागला तेव्हा संकेतने त्याचा पाठलाग करून मागून मानेवर चाकूचे सपासप वार केले. शुभम बेशुद्ध पडला. त्याच्या साथीदारांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. प्रकृती सुधारल्यावर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. त्याआधारे गुन्हा दाखल करत संकेतविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी संकेतला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान, संकेतनेही शुभमच्या गटाविरुद्ध तक्रार दिली. शुभमसह महेश पोपळघट, अनिकेत ज्ञानेश्वर जगताप, किरण जगताप यांनी मिळून तू खूप मोठा दादा झालास का? तुझ्या जिवावर शुभम मातकर उड्या मारतो, असे म्हणत मला मारहाण केली, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. मुकुंदवाडी सातत्याने खुनी हल्ले, खून होत आहेत. गुन्हेगारांच्या नवनव्या टोळ्या उदयास येत आहेत. त्यांच्यात वर्चस्वावादातून हाणामाऱ्या होत आहेत. याला अंकुश लावण्यात मुकुंदवाडी पोलीस अपयशी ठरल्याचे दिसून येत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software