फॉलोअप : कल्पनाचा प्रियकर, गृहमंत्र्यांच्या तोतया ओएसडीच्या मुसक्या आवळल्या!, कसून चौकशी सुरू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव) हिच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी म्हणून नंबर सेव्ह असलेला अभिषेक चौधरी याला शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) रात्री अटक करण्यात आली आहे. तिचा प्रियकर महंमद अशरफ खिलच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. दोघांनाही दिल्लीतच पकडण्यात आले. दोघांची कसून चौकशी सुरू आहे.

कल्पना अभिषेकच्या संपर्कात असायची. तोतया आयएएस अधिकाऱ्यांचे सिंडिकेट असल्याची शक्यता आहे. अभिषेक चौधरीदेखील विदेशी लोकांच्या संपर्कात आहे का, याचा तपास केला जात आहे. पाकिस्तान,अफगाणिस्तान, बांगलादेश, सौदी अरेबियाचे नंबर कल्पनाच्या मोबाइलमध्ये मिळाले होते. त्यावर तिने किती वेळा संपर्क केला, त्या क्रमांकावरून तिला किती वेळा कॉल आले, याचा तपास केला जात आहे. जेव्हा कल्पना हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये पकडली गेली, तेव्हा तिच्याकडे २०१७ ची यूपीएससीची निवडसूची मिळाली होती. कल्पनाने त्यात स्वतःचे नाव घालत होते.

ही यादी मनोज लोढा व दत्तात्रय शेटे यांनी दिल्याचे कल्पनाने पोलिसांना सांगितले. मात्र या व्यक्ती खरंच आहेत, की बनावट नावे तिने सांगितली, याचा शोध घेतला जात आहे. कल्पना अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या संपर्कात होती. आयएएस असल्याचे सांगून ती त्यांना फसवत असल्याचा संशय आहे. पोलीस कोठडीतही कल्पनाचे नखरे कायम असून, घर झडतीवेळा समोरच बसण्याचा आग्रह असो, की तपासादरम्यान लस्सी पिण्याचा किंवा हवे ते पदार्थ मागवण्याचा हट्ट असो, तिचा रवय्या पाहून पोलीस हैराण आहेत. रात्री ती आईसोबत कॉलवर बोलणे करून देण्याची मागणी करते. अन्यथा जेवणार नाही म्हणते. अधिकाऱ्यांनी मात्र तिचा हट्ट फेटाळून लावला. 

पार्श्वभूमी...
कल्पना भागवत ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी थांबल्याची गोपनीय माहिती सिडको पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी हर्सूलच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार, सहायक पोलीस निरीक्षक अरुणा घुले, वर्षा काळे यांच्यासह हॉटेलमध्ये जाऊन २२ नोव्‍हेंबरला कल्पनाला अटक केली. तिच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यातील अंमलदार सतीश बोर्डे यांनी तक्रार दिली आहे. कल्पनाने हॉटेलमध्ये थांबण्यासाठी जे आधारकार्ड दिले होते, त्यावर खाडाखोड केल्याचे दिसून आले होते. तिच्याकडे केंद्रीय लोकसेवा आयोगातील २०१७ ची यादीही तिच्याकडे मिळाली होती. ही यादीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software