इथेनॉल वाहतुकीच्या टँकरला वेल्डिंग करताना स्फोट, १ ठार, २ गंभीर, शेंद्रा MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सहकार्याने) : वेल्डिंग करताना स्फोट होऊन वेल्डर लक्ष्मण विनायक कुबेर (वय ३२, रा. गेवराई कुबेर, ता. छत्रपती) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. ही घटना रविवारी (१४ सप्‍टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेंद्रा एमआयडीसीतील हर्मन कंपनीमागील ऑल सुपर इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन वर्क येथे घडली.

इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरला गळती लागून इथेनॉल वाया जात असल्याने हे टँकर (क्र. एमएच २० जीसी ३२८८) वेल्डिंग करण्यासाठी आणण्यात आले होते. लक्ष्मण टँकरमध्ये बसून गळती लागलेल्या ठिकाणी वेल्डिंग करत होते. अचानक स्फोट झाला. लक्ष्मण यांचा जागीच मृत्यू झाला. टँकरबाहेर उभे संतोष महानोर, रमेश गावडे हे जखमी झाले. टँकर कट करून लक्ष्मणला बाहेर काढून उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अल्पभूधारक शेतकरी असलेले लक्ष्मण शेती व वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, बहीण, असा परिवार आहे. घटनेची नोंद करमाड पोलिसांनी घेतली आहे. अधिक पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राहुल पगारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software