वाढत्या गुन्हेगारीमुळे वाळूज MIDC त चिंता, आता हॉटेलचालकाची ग्राहकाला अमानुष मारहाण!, प्रकृती चिंताजनक, बजाजनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस गुन्हेगारांना वठणीवर आणण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. बजाजनगरमधील मोरे चौकातील एका हॉटेलचालकाने भरदिवसा ग्राहकावर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला. आज, २१ जानेवारीला सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले.

दोन युवक नाश्ता व चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये आले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही मिनिटांतच मारहाणीत बदलला. हॉटेलचा वृद्ध चालक आणि त्याचा नातेवाइक असलेल्या चहाच्या टपरीचालकाने एकत्र येत ग्राहक युवकावर हॉटेलसमोरच हल्ला चढवला. डोक्यावर लाकडी दांडक्याचा जोरदार घाव बसताच युवक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जखमी युवकाची प्रकृती अत्यवस्थ असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता. वाळूज एमआयडीसी परिसरात अवैध दारू, हॉटेलवरील गैरप्रकार, गुन्हेगारी खुलेआम सुरू असताना पोलिसांचा धाक निर्माण कधी होणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software