नशेखोराचे तरुणावर चाकूचे वार, खिशातून ५ हजार रुपये हिसकावले!, चिकलठाणा MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नशेखोराने खासगी कंपनीतील कामगार तरुणावर चाकूचे वार करत लुटले. यात तरुण जखमी झाला असून, त्याचे ५ हजार रुपये नशेखोराने नेले. ही घटना चिकलठाणा एमआयडीसीतील साई चौक पावरलूमजवळ रविवारी (११ जानेवारी) रात्री आठला घडली.

भूषण परमेश्वर सूरडकर (वय २१, रा. ब्रिजवाडी रिक्षा स्टँडजवळ) याने याप्रकरणात तक्रार दिली आहे. तो आई, वडील, भावासह राहतो. हरमन फिनिक्युम लिमिटेड, चिकलठाणा एमआयडीसी येथे नोकरी करतो. प्रसंजित हिवाळे (वय २०, रा. मुकुंदवाडी) हा त्याच्या ओळखीचा असून दोघांत भांडण झाले होते. वाद मित्रांच्या मध्यस्थीने मिटला होता. रविवारी (११ जानेवारी) रात्री आठला भूषण व त्याचा मित्र सुमित मिसाळ हे साई चौक पावरलूम येथे बसलेले असताना प्रसंजित तिथे नशेत आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याने भूषणला शिवीगाळ केली.

कमरेचा चाकू काढून डोक्यात मारत असताना भूषणने तो हाताने अडवल्यामुळे डाव्या हाताला चाकू लागला. त्यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवत भूषणच्या पँटच्या बाजूच्या खिशात हात घालून ५ हजार रुपये हिसकावले व जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर दुचाकीवरून निघून गेला. भूषणच्या खिशात पगाराचे पैसे होते. ते प्रसंजितने हिसकावून नेले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर भूषणने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी प्रसंजितविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास लहाने करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग

Latest News

वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत गुरुवारी (१२ मार्च) सकाळी ८.३० च्या सुमारास केमिकलयुक्त ऑइलच्या...
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
एक लांडगा घरासमोर आला... असहायपणे उपचार करा म्हणाला, उपचार होताच जंगलात परत गेला... पुस्तकातील गोष्ट नव्हे, फर्दापूरची खरीखुरी घटना आहे!
खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software