छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यानेच रचला डेंटल कॉलेजच्या बदनामीचा कट!; पोलिसांच्या चौकशीत समोर आले धक्कादायक कारण... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या दंत महाविद्यालयाच्या बदनामीचा ई-मेल अंतिम वर्षातील विद्यार्थ्यानेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांना केला. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन हादरून गेले. चौकशीत हा ई-मेल ज्याने केला, त्या विद्यार्थ्याला पोलिसांनी विचारले असता त्याने कमी हजेरीमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेला मुकावे लागण्याच्या भीतीने  महाविद्यालयात त्रास होत असून आत्महत्या करावी वाटते, असा इ-मेल केल्याचे सांगितले.

खान तासीम सरताज मोहंमद (रा. मंजूरपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध उपप्राचार्य डॉ. सदाशिव डावकर यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे दंत महाविद्यालय नक्षत्रवाडीत आहे. विद्यापीठ, पोलीस व महाविद्यालयाच्या संयुक्त चौकशीत तासीमने बदनामीच्या उद्देशाने हे कृत्य केले. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी या घटनेची माहिती पत्रकारांना दिली. दंत महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पत्र प्राप्त झाले. त्यात एका विद्यार्थ्याने महाविद्यालयाची तक्रार करणारा इ-मेल केला असून त्यात मानसिक तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे.

महाविद्यालयाचे वातावरण नकारात्मक आहे. स्टाफ चांगली वागणूक देत नाही. ते त्रास देतात. हॉस्पिटलमध्ये कुणी रुग्ण नसतात. आर्थिक व मानसिक तणाव निर्माण करतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्रास होतो म्हणून आत्महत्या करावी वाटते, असे इ-मेलमध्ये तासीमने म्हटले होते. महाविद्यालयाच्या प्रशासनाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यात तो महाविद्यालयाचाच विद्यार्थी असून मंजूरपुरा भागात राहत असल्याचे समोर आले. चौकशीत त्याने कबूल केले, की तो चतुर्थ वर्षात शिकत असून, अनुपस्थितीमुळे परीक्षेला बसता येणार नसल्याने असा प्रकार केल्यावर परीक्षेला बसता येईल, असे त्याला वाटले. पण पोलिसांच्या तपासात त्याचे बिंग फुटले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software