सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको पोलिसांनी गौतमनगरात मोठा छापा मारून देशीचा दारूचे २० बॉक्स पकडले. दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (११ जानेवारी) रात्री आठच्या करण्यात आली.

बाळू गणराज (रा. गौतमनगर, आंबेडकरनगर) व आनंद रावसाहेब सदाशिवे (रा. गौतमनगर आंबेडकरनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार प्रदीप फरकाडे यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण देशी दारूचे २० बॉक्स पोलिसांनी जप्त केले असून, त्यात एकूण ७६ हजार ८०० रुपयांच्या ९६० बाटल्या आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास विशेष पथक गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली, की एका व्यक्तीने गौतमनगरातील घरात बेकायदेशीररित्या देशी दारूच्या बाटल्यांचा साठा करून ठेवला आहे. पथकाने लगेचच त्या घरावर छापा मारला.

तेथे घरात एक महिला मिळून आली. तिला विचारणा केली असता तिने सांगितले, की दारूचे बॉक्स माझा नातू बाळू गणराज व आनंद सदाशिवे यांनी आणून ठेवले आहेत. पोलिसांनी हे दारूचे बॉक्स जप्त केले. बाळू व आनंदला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. ही कारवाई पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेवाळे, पोलीस अंमलदार मंगेश पवार, सहदेव साबळे, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे, अमोल अंभोरे यांनी केली. अधिक तपास पोलीस अंमलदार कोकणे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software