छत्रपती संभाजीनगर हादरले : पत्‍नी अन्‌ भावजीला एकत्र पाहिले... नाईट ड्युटीवरून अचानक घरी धडकलेल्या तरुणाने भावजीचा केला खून!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पत्नी व भावजीला एकत्र पाहिल्यानंतर संतप्त तरुणाने लोखंडी पकडीचे घाव डोक्‍यात घालून भावजीची हत्‍या केली. ही धक्कादायक घटना रविवारी (१९ ऑक्‍टोबर) सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास उस्मानपुऱ्यात घडली.

संतोष काशिनाथ खाजेकर (वय ३८, रा. म्हाडा कॉलनी, ता. गंगापूर) असे हत्या झालेल्याचे नाव असून, बळीराम कल्याण जगधने (रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज एमआयडीसी, ह. मु. उस्मानपुरा) असे हत्‍या करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी बळीरामला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २१ ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात संतोष खाजेकरचा मुलगा सुजित खाजेकरने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी (१८ ऑक्‍टोबर) रात्री बळीराम नाइट ड्युटीला गेला होता.

तो गेल्यानंतर संतोष त्याच्या घरी आला आणि मुक्कामी थांबला. रविवारी सकाळी साडेसहालाच नाइट ड्युटीवरून बळीराम घरी धडकला. ते पाहून पळापळ केलेला संतोष टेबलखाली लपला. नंतर बळीरामच्या पत्नीने दार उघडले. दरवाजा उघडायला वेळ लागल्याने बळीरामला संशय आला होताच, त्याने घरात पाहिले असता संतोष टेबलखाली लपलेला दिसला. त्याला पाहून बळीरामचा संताप अनावर झाला. त्याने संतोषला टेबलखालून बाहेर ओढत बेदम चोप द्यायला सुरुवात केली.

हाती लागलेल्या लोखंडी पकडीचे घाव त्याच्या डोक्यात घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर बळीरामने पत्नीला बेदम चोप द्यायला सुरुवात केली. सायकल तिच्या डोक्यात घातली. त्याच्या पत्नीने कसाबसा जीव वाचवून सकाळी साडेसातला संतोषचा मुलगा सुजितला कॉल केला. सुजित लगेचच घटनास्‍थळी धावला. तोपर्यंत रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोषचा मृत्‍यू झाला होता. नागरिकांच्या मदतीने सुजितने पोलिसांना कळवले. उस्मानपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. संतोषला घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास उस्मानपुरा पोलीस करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software