कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांनी खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला आर्थिक योजनांचा लाभ मिळण्यासाठीचे योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी महिला बालकल्याण आणि कृषी विभाग तसेच महसूल विभागाला दिले. खुलताबाद तालुक्यातील तिसगाव तांडा येथे आत्महत्या केलेले शेतकरी चांगदेव राठोड यांच्या घरी भेट दिली व कुटुंबातील सदस्यांना धीर देऊन सांत्वन केले. कन्नड तालुक्यातील सासेगाव येथे मिट्टूसिंग रुपसिंग सुलाने यांच्या कुटुंबियातील सदस्याची विचारपूस केली. मुलांच्या शिक्षणासंदर्भातील आर्थिक मदत व शैक्षणिक मदती संदर्भातही संबंधित विभागाला  सूचित केले. या वेळी गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, तहसीलदार श्री. पांढरे, कन्नड तालुका कृषी अधिकारी, अन्य संबंधित विभागाचे अधिकारी समवेत होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software