ब्रिजवाडी हादरले ! दरवाजा तोडून घरात घुसले, तरुणाला बेदम मारहाण करत रिक्षातून केले अपहरण!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दरवाजा जोडून घरात घुसत तरुणाला बेदम मारहाण केली. नंतर त्‍याचे रिक्षातून अपहरण करण्यात आल्याची घटना ब्रिजवाडीत गुरुवारी (२५ सप्टेंबर) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

रोहीत सतीश साबळे (वय २०, रा. पाण्याच्या टाकीजवळ, ब्रिजवाडी, सिडको एमआयडीसी) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्‍याचे वडील सतीश रामचंद्र साबळे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी शिला ढेपे, सिध्दार्थ ढेपे, सतीश ढेपे, नीलेश ढेपे, बाबासाहेब गायकवाड व ४ ते ५ लोकांविरुद्ध (सर्व रा. ब्रिजवाडी) गुन्हा दाखल कले आहे. सतीश साबळे हे कंपनीत खासगी नोकरी करतात. त्यांचा मोठा मुलगा रोहीत हा ICL कंपनी NRB कंपनीशेजारी MIDC चिकलठाणा येथे नोकरी करतो.

गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास सतीश साबळे हे सिंदीबन येथे नातेवाइकाच्या घरी असताना लहाना मुलगा स्वप्निल (१७) याने त्यांना कॉल केला व सांगितले, की मी व रोहीत घरात असताना घराचा समोरचा दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. बाहेर काही लोक आरडाओरड करत असल्याचा आवाज आला. दरवाजा उघडण्याच्या अगोदर त्या लोकांनी मागच्या बाजूचा किचनचा दरवाजा तोडून घरात घुसले व रोहीतला हाताचापटाने मारहाण करू लागले.

त्यात आपल्या गल्लीतीलच शिला ढेपे, सिध्दार्थ ढेपे, सतीश ढेपे, नीलेश ढेपे, बाबासाहेब गायकवाड व त्यांच्यासोबत आणखी ४ ते ५ लोक (सर्व रा. ब्रिजवाडी) होते. त्यांनी रोहीतला शिवीगाळ केली. त्यापैकी एकाने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने रोहीतला मारहाण केली. रोहीतला उचलून रिक्षात टाकून घेऊन गेले. हे ऐकताच सतीश साबळे यांनी लगेचच घरी धाव घेतली. नातेवाइकांसोबत मिळून रोहीतचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. अखेर साबळे यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software