मोठी बातमी : वाळूज MIDC तील उद्योजकाची ९१ लाखांची फसवणूक, ‘मिन्सून इन्फ्रा’च्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील के. पी. सेल्स कॉर्पोरेशन कंपनीचे मालक जयराज बाबुराव पाटील (वय ५३, रा. सिडको एन २ ठाकरेनगर) यांची पुण्याच्या मिन्सून इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या मालक व संचालकांनी ९१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली. या प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे, की कंपनी टाटा व जिंदाल या कंपन्यांचे पाईप औद्योगिक क्षेत्रात पुरवतात. त्यांच्या कंपनीचे कार्यालय वाळूज एमआयडीसीतील सीएसआर कॉम्लेक्समध्ये आहे. २९ एप्रिल २०२५ मध्ये पुण्याच्या मिन्सून इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीचे मालक व संचालक राहुल महीमकर व प्रिती माहीमकर हे जयराज पाटील यांच्याकडे आले. त्यांना जिंदाल कंपनीच्या पाईपची आवश्यकता होती. त्यांच्या ऑर्डरप्रमाणे पाटील यांनी त्यांच्या कंपनीला डीएमआयसी बिडकीन, पाँडेचेरी, धारवाड, कागल कोल्हापूर, चाकण पुणे, खोपोली या साईटवर पाईप पुरवला. एकूण २ कोटी २६ लाख १९० रुपयांचे साहित्य पुरवले होते. त्यावर त्यांनी १ कोटी ३४ लाख ९९ हजार ४०१ रुपये पाटील यांना दिले. ९१ लाख ८२ हजार ७८९ रुपये बाकी होते.  मात्र हे पैसे देण्यास राहुल माहीमकर व प्रिती माहीमकर यांनी टाळाटाळ केली. त्यांना कॉल केले. मात्र त्यांनी कॉल उचलले नाहीत. त्यांनी कळविले, की संबंधितांकडून पैसे मिळाले नाहीत.

त्यांच्याकडून पैसे आले तर तुम्हाला देतो. त्याबाबत पाटील यांनी खात्री केली असता ज्या साईटवर माल पुरवला होता, त्यांनी माहीमकरला पैसे दिलेले होते. राहुल व प्रिती माहीमकर मात्र पाटील यांना पैसे देत नव्हते, हे दिसून आले. याबाबत त्यांनी पाठपुरावा केल्यावर त्यांनी ६ धनादेश दिले. हे धनादेश बाऊन्स झाले. पुन्हा राहुल माहीमकरने ६ धनादेश दिले. ते माहीमकरने बँकेत कॉल करून पैसे देण्यास थांबवले. त्यामुळे जाणीवपूर्वक विश्वासघात करून पैसे आज देतो, उद्या देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन फसवणूक केल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी राहुल व प्रिती माहीमकरविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. ठाकरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software