रांजणगाव शेणपुंजी फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, बाटल्या लुटण्यासाठी उसळली गर्दी पहा व्हिडीओ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिअर बाटल्यांची वाहतूक करणारा भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी फाट्यावर आज, २८ नोव्‍हेंबरला रात्री सव्वा नऊच्या सुमारास उलटला. त्यातील सर्व बिअस बॉक्स रस्‍त्‍यावर पसरले. ते पाहून बिअरच्या बाटल्या नेण्यासाठी गर्दी उसळली. मद्यपींनी हातात बसतील तितक्या बाटल्या लांबवल्या. काहींनी थैलीत घालून नेल्या, तर काहींनी चक्क गोण्या आणून त्यात बाटल्या नेल्या. अर्धा ट्रकमधील बिअर बाटल्या गर्दीने लंपास केल्या, तरी चालकाकडे कुणाचे लक्ष नव्हते. तो चालक केबिनमध्ये फसला होता. वेदनेने विव्हळत होता. सुदैवाने सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन, पप्पू सय्यद आदींनी घटनास्‍थळी येऊन त्याला केबीनमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले.

WhatsAppImage2025-11-28at10.41.50PM
हरवलेली माणुसकी पाहून डोळ्यांत अश्रू तरळलेला ट्रकचालक सय्यद अब्‍दुल्‍ला.

 

चालक सय्यद अब्दुल्ला यांच्या म्‍हणण्यानुसार, ताे TUBORG बिअरचा माल घेऊन वाळूज एमआयडीसीतून जळगावला जात होता. अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने ही दुर्घटना घडली. ट्रक सिंग ट्रान्सपोर्टचा आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, नितीन इनामे, लखन घुसिंगे, शिवनारायण नागरे, शुभम वीर, राजू वाघ, सुरेश कचे, गजानन कसबेवाड यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी घेतली आणि मद्यपींना हुसकावून लावले. अग्निशमन दलाच्या पथकानेही घटनास्‍थळी येत पाण्याचा मारा करून गर्दी पांगवली. रात्री उशिरापर्यंत ट्रक रस्‍त्‍यावरून हटविण्याचे काम सुरू होते. या घटनेचा व्हिडीओ छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजच्या हाती लागला असून, तो पाहून माणुसकी किती हरवली आहे, याची जाणीव नक्कीच होते. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना सिल्लोड तालुक्यातील नानेगाव-जंजाळा रस्त्यावरील गट क्र....
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software