बाप रे बाप... रक्कम ३ वर्षांत १५ पट होणार, आमिषाला भुलले २० जण, गमावून बसले ७५ लाख !, संतोष कोकाटे सेव्हन हीलचं ऑफीस बंद करून झाला पसार...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेव्हन हील येथील रघुवीर चेंबरमध्ये मनी प्लँट ग्रोथ कंपनी स्थापन करून संतोष तुकाराम कोकाटे (रा. प्राईड इनिग्मा, सुतगिरणी चौक गारखेडा) याने २० जणांना गुंतवणूक केल्यास तीन वर्षांत १५ पटीने रक्कम वाढवून देण्याचे आमिष दाखले. सर्वांचे ७५ लाख ७५ हजार रुपये घेऊ कार्यालय बंद करून तो पसार झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर याप्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी मंगळवारी (३० डिसेंबर) संतोष कोकाटेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दत्तू यादवराव थोरात (वय ५९, रा. नंदिनीनगर गारखेडा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते १९८५ मध्ये सैन्यात भरती झाले होते. एप्रिल २०१५ मध्ये सुभेदार  पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये माजी सैनिक महामंडळ नंदनवन कॉलनी भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथे परत वसुली अधिकारी पदावर भरती झाले. सप्टेंबर २०२० मध्ये फेसबुकवर त्यांना मनी प्लॅट ग्रोथ कंपनी ही शेअर मार्केटींग करते. त्यात ठेवीदारांनी ठेवलेल्या रकमेवर ३ वर्षांत दाम दुप्पट करते, याब‌द्दलची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी रघुवीर चेंबर्स सेव्हनहिल येथील या कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे संतोष तुकाराम कोकाटे याची भेट झाली. त्याने सांगितले, की तुम्ही आमच्याकडे जर १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आम्ही त्या रकमेचे तीन वर्षांत १५ लाख रुपये देऊ. त्याने काही लोकांना चांगला परतावा रक्कम दिल्याचेही सांगितले. थोरात यांनी लगेचच १ लाख रुपये दिले. कोकाटे याने १५ लाख रुपयांचा धनादेशही ३ वर्षांनंतरची तारीख टाकून दिला. त्यानंतर थोरात यांनी पुन्हा १ लाख रुपये दिले. नंतर पुन्हा ८ लाख रुपये दिले. नंतर आणखी अडीच लाख रुपये दिले. कोकाटे त्यांना ३ वर्षांनंतरच्या तारखेचे धनादेश रक्कम भरून देत राहिला.

एकूण १३ लाख ५० हजार रुपये थोरात यांनी गुंतवले. त्यानंतर संतोष कोकाटे हा त्याचे कार्यालय बंद करून बेपत्ता झाला. थोरात यांच्याप्रमाणे भगवान साहेबराव जंगले यांचे १० लाख, अनिल कारभारी हाके यांचे १० लाख, अशोक तुळशीराम बडक यांचे ८ लाख, अण्णासाहेब सुभाष शेजूळ यांचे ८ लाख, प्रशांत बाबासाहेब कोळसे यांचे ५ लाख, सुभाष नामदेव शिंदे यांचे ५ लाख, किरण प्रभात चव्हाण यांचे साडेचार लाख, भरत राधाकृष्ण अहीरे यांचे ४ लाख, संदीप आसाराम मोरे यांचे सव्वा दोन लाख, गोकुळ आबाराव काळे यांचे २ लाख, शत्रुघ्न फुके यांचे २ लाख, किरण गणपत मनगटे यांचे २ लाख, रामदास साळुबा पंडीत यांचे २ लाख, विष्णू आनंदराव काळे यांचे दीड लाख, मंजीत किशन थोरात यांचे दीड लाख, सखाराम पुंजाजी थोरात यांचे १ लाख, महाबाई प्रभाकर गोराडे यांचे ५० हजार, सविता श्यामराव गाडेकर यांचे ५० हजार, श्यामराव दगडू गाडेकर यांचे ५० हजार घेऊन कोकाटे पसार झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software