पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संशयास्पदरित्या थांबलेल्या कारमध्ये बसलेल्या दोघांकडे पोलिसांना पिस्तुल मिळून आली. त्यांना अटक करून ४ लाखांची होंडा सिटी कार (क्र. एमएच २० इयू ६०६२) आणि लोखंडी मॅगझिन असलेले पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज, १२ जानेवारीला पहाटे तीनच्या सुमारास जिगीशा स्कूल ते सनी हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर सिडको एन ७ येथे करण्यात आली.

रविनाथ रामकृष्णा बर्डे (वय २६, रा. हरीओमनगर, सईदा कॉलनी, स्वराज्य चौक जवळ, जटवाडा रोड हर्सूल), शुभम छगन सलामपुरे (वय २५, रा. जयसिंगपुरा, बिबीका मकबरा परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार विनोद खरात (वय ३८) यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटे तीनला डायल ११२ अंमलदार विनोद खरात व उत्तम जाधव हे गस्त घालत असताना सिडको एन ७ येथे कारमध्ये दोघे जण संशयास्पद बसलेले होते. पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ चव्हाण कळविण्यात आले.

ते लगेचच घटनास्थळी आले. पोलिसांनी कारमधील दोघांची झडती घेतली असता रविनाथ बर्डे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व मॅगझिन मिळून आले. पोलिसांनी रविनाथ आणि शुभमला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. रविनाथविरुद्ध यापूर्वी बेगमपुरा, हर्सूल पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ चव्हाण, पोलीस अंमलदार विनोद खरात व उत्तम जाधव यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software