सुसाट दुचाकीच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू, धूत हॉस्पिटलसमोरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट दुचाकीस्वाराने ६५ वर्षीय वृद्धेला उडवले. यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जालना रोडवर धूत हॉस्पिटलसमोर बुधवारी (१ ऑक्टोबर) दुपारी ३ च्या सुमारास घडली. चंद्रभागाबाई संपत जाधव (वय ६५, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

चंद्रभागाबाई यांचा मुलगा फकिरा संपत जाधव (वय ३५) यांच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मोटारसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फकिरा यांची लहान बहीण उषा मानसिक रुग्ण असल्याने तिच्यावर सिडको बसस्थानकाजवळील डॉ. कंदारफळे यांच्याकडे उपचार सुरू आहेत. तिच्या प्रत्येक महिन्याच्या गोळ्या डॉक्टरांकडून घेण्यासाठी चंद्रभागाबाई छत्रपती संभाजीनगरला येतात. फकिरा यांचे साले श्याम विलास गवई (रा. रामनगर मुकुंदवाडी) यांच्याकडेही त्या जात असत.

बुधवारी दुपारी चंद्रभागाबाई छत्रपती संभाजीनगरला आल्या. दुपारी तीनला फकिरा यांचा लहान भाऊ आकाश संपत जाधव (वय २५) याने फकिरा यांना कॉल करून कळवले, की आई चंद्रभागाबाई यांचा थोड्या वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील धूत हॉस्पिटलसमोरील रोडवर रामनगरकडे पायी जाताना मोटारसायकल चालकाने धडक दिल्याने अपघात झाला आहे. आईला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. उपचार चालू असताना रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी चंद्रभागाबाई यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस अंमलदार राजू कोतवाल करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software