खासगी बँकेत अधिकारी असलेली महिलाही सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली, २६ लाख गमावून बसली!; सिडको पोलिसांत तक्रार...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासगी बँकेत अधिकारी असलेली २८ वर्षीय तरुणीसुद्धा सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली आणि २६ लाख ७३ हजार रुपये गमावून बसली. सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तरुणीने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ४ सायबर भामट्यांविरुद्ध शुक्रवारी (१२ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलला रेटिंग देण्याचे टास्क देण्याच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष तिला दाखवले होते. पण असे जाळ्यात गुंतवले, की स्वतःच पैशामागून पैसे मागत गेले आणि तरुणीला पैसे देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या प्रकरणात नक्की काय घडलं, वाचकांनीही अलर्ट राहिलं पाहिजेत, कशी फसवणूक होऊ शकते, यासाठी ही घटना आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगत आहोत...

तक्रारीनुसार, टीव्ही सेंटर भागात राहणारी  माही (नाव बदलले आहे.) राष्ट्रीयीकृत बँकेत रिलेशनशिप मॅनेजर आहे. २४ नोव्‍हेंबरला त्यांना व्हॉटस ॲपवर एक मेसेज आला. NSE HR Derpartment चा असल्याचे दर्शविले होते. मेसेजमध्ये टेलिग्राम अॅपवर जाण्यास सांगितले. त्यामुळे माहीने टेलिग्राम ॲप ओपन करून पाहिले असता रंजिता विजयवर्गिया या टेलिग्राम अकाऊंटवरुन पार्ट टाईम जॉबसाठी ऑफर दिली होती. त्यावर माहीने यस असा रिप्लाय केला. त्यांच्या कंपनीबाबत माहिती विचारली असता त्यांनी NSE ऑफिसचा फोटो, कंपनीचे लेटरपॅड व इतर माहिती पाठविली. त्यानंतर त्यांनी माहीला टास्क दिला आणि लिंक पाठवून ती ओपण करण्यास सांगून हॉटेलच्या फोटोला फाइव्ह स्टार रेटींग देण्यास सांगितले.

त्या दिवशी माहीने २० टास्क पूर्ण केले. त्यांनी माहीच्या खात्यावर २०० रुपये पाठवले. २५ नोव्‍हेंबरला पुन्हा २० टास्क पूर्ण करण्यासाठी दिले. तिसऱ्या टास्कवेळी तिला मेसेज‌द्वारे सांगण्यात आले, की ८०० रुपये भरले तर ३० टक्के कमिशन देण्यात येईल. त्यानंतर माहीला क्यूआर कोड पाठवून ८०० रुपये भरायला सांगितले. त्यानंतर NSE ची लिंक पाठवून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर विकास यादव या व्यक्तीची टेलिग्रामची लिंग पाठवून मिशन कोड दिला. तो गोल्ड पर्चेस ट्रेडिंगचा टास्क देण्यात आला. तो माहीने पूर्ण केला. त्याचे पैसे विड्रॉ करण्यासाठी त्यांनी अपेक्षा पांडे या टेलिग्राम अकाऊंटची न्यू रिसेप्शनिस्ट  म्हणून लिंक पाठविली. तिला क्यूआर कोड पाठविल्यावर माहीच्या खात्यात १ हजार ४० रुपये जमा करण्यात आले. अपेशा पांडे हिने एका हॉटेलची लिंक पाठवून फाइव्ह स्टार रेटींग देण्यास सांगितले.

इतर हॉटेलच्याही लिंक पाठविल्या. सातव्या टास्कला १००० रुपये भरण्यास सांगितले. तेही माहीने पाठवले. नंतर २ हजार रुपये भरण्यास सांगितले. ते भरले तरच आधीचे १००० रुपये काढता येईल, असे सांगितले. माहीने २ हजार रुपये भरले. मग तुमचा टास्क चुकला, असे सांगून त्यांनी आणखी १ हजार रुपये मागितले. मग टास्क चुकत गेले, माहीत पैसे भरत गेली, आधीचे पैसे परत मिळतील या आशेने तिने एकूण २६ लाख ७३ हजार रुपये पाठवले. पण नंतर तिचा एक रुपयासुद्धा भामट्यांनी परत केला नाही. फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर तरुणीने सिडको पोलिसांत धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी अनोळखी ४ भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software