किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या अंमलीपदार्थ प्रतिबंध विभागाने किलेअर्कजवळ मोठी कारवाई करत दीड लाखाचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. ड्रग्ज तस्करालाही अटक करण्यात यश मिळवले. ही कारवाई शुक्रवारी (९ जानेवारी) रात्री करण्यात आली.

शेख कैफ शेख सलीमोद्दीन (वय २३, रा. हजहाऊस जवळ किलेअर्क छत्रपती संभाजीनगर ह. मु. वेंचस्टरी शाळेजवळ सईदा कॉलनी छत्रपती संभाजीनगर) असे पकडण्यात आलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. त्याने ज्याच्याकडून ड्रग्ज आणले त्या शारुख (रा. आलमगीर मशिदीजवळ, मालेगाव, जि. नाशिक) याच्याविरुद्धही बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विजय त्रिभुवन यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, किलेअर्क येथील हज हाऊसच्या बाजूला कैफ नावाचा व्यक्ती त्याच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रोन ड्रग्जची विक्री करत आहे.

गच्चे यांनी लगेचच वरिष्ठांना कळवून छाप्याचे नियोजन केले. पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि सहकाऱ्यांना सोबत घेत रात्री ८ ला किलेअर्क येथील हज हाऊसजवळील संशयिताचे घर गाठले. कैफ पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी पकडले. अंगझडतीत त्याच्याकडे हिरव्या पिशवीत मेफेड्रोन ड्रग्जच्या एकूण ३७ पॅकींग पिशवी आढळल्या. त्याचे वजन २४.१८ ग्रॅम भरले. त्याची किंमत १ लाख ४५ हजार रुपये आहे. १ लाख २० हजार रुपयांचा आयफोन आणि रोख ९ हजार ७२० रुपये असा एकूण २ लाख ७४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कैफकडे पोलिसांनी ड्रग्ज कुठून आणले, याची चौकशी केली. त्यावर त्याने शारुख याच्याकडून आणल्याचे सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software