भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर नशेखोराचा अचानक दोन तरुणांवर चाकूहल्ला, १ गंभीर, अदालत रोडवरील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात कामानिमित्त आलेल्या दोन तरुणांवर अचानक दोन नशेखोरांनी चाकूहल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण छाती आणि पोटात चाकूचे वार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. ही थरारक घटना सोमवारी (२४ नोव्‍हेंबर) दुपारी अडीचला अदालत रोडवर पगारिया बजाज शोरूमच्या बाजूला घडली.

फेब्रिकेशन व्यावसायिक विजय गोरख साळुंके (वय २१, रा. मांगेगाव ता. गंगापूर) याने याप्रकरणात तक्रार दिली आहे. सोमवारी (२४ नोव्‍हेंबर) दुपारी अडीचला तो व त्याचा मित्र गौरव संजय मावस (वय २३, रा. मांगेगाव ता. गंगापूर) बाबा पेट्रोलपंप चौकातून अदालत रोडने कोर्टाकडे पायी येत होता. पगारिया बजाज शोरूमच्या बाजूला फूटपाथवर समोरून दोन जण पायी येत होते. त्यातील एक जण अचानक विजय आणि गौरवकडे आला. जवळील चाकू काढून गौरवच्या छातीत वार केला. पुन्हा चाकूने दुसरा वार पोटात करून गंभीर जखमी केले.

त्यानंतर तो व त्याचा साथीदार बाबा पेट्रोलपंपाच्या दिशेने पळून गेले. चाकूने वार करणाऱ्याने अंगात काळे जरकिन व काळी पँट घातलेली होती. त्याचा बांधा सडपातळ होता व उंची अंदाजे ५ फूट ६ इंच, केस वाढलेले अंदाजे वय २५ वर्षे, त्याच्यासोबतचा तरुण सडपातळ बांधा असलेला त्याने अंगात टी शर्ट घातलेला व केस कुरळे असलेला अंदाजे ५ फूट ६ इंच उंची असलेला होता. विजयने गौरवला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. सीसीटीव्ही फूटेजद्वारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. नशेखोरांकडूनच हा प्रकार झाल्याचा संशय आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software