चाकूहल्ल्याप्रकरणी चुलत भाऊ, पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल, औरंगपुऱ्यातील शिवसेना भवनसमोर काय घडलं होतं?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : औरंगपुऱ्यातील शिवसेना भवनसमोर चाकूहल्ला करून जखमी केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून क्रांती चौक पोलिसांनी पिता-पुत्राविरुद्ध रविवारी (३० नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. मनीष गोपीचंद बाखरिया (वय ३०, रा. नंदनवन कॉलनी) यांनी अनिरुद्ध विवेक जैस्वाल (वय ३१) आणि विवेक लक्ष्मण जैस्वाल (वय ५७, रा. कुंभारवाडा) यांच्याविरुद्ध पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने न्यायालयात धाव घेतली होती.

हल्ल्याची घटना ११ ऑक्‍टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. तक्रारीनुसार, मनीष हे दुचाकीने मोबाइल दुरुस्तीसाठी औरंगपुऱ्यातून पैठण गेटकडे जात असताना अनिरुद्ध जैस्वाल याने मागील भांडणामुळे रस्त्यात अडवले. जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला केला. हा हल्ला हातावर लागला. त्यानंतर दोघांत झटापट झाली. गर्दी जमली. त्यांनी मनीष यांना अनिरुद्धच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर मनीष हे सिटी चौक पोलीस ठाण्यात गेले. मात्र पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन घाटी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी हल्लेखोरासोबत संगणमत करून मनीष यांनाच घाटी रुग्णालयातून अटक केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर मनीष यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मनीष यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने अखेर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software